सध्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार क्षेत्रात कोरोना चां प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.. अशावेळी ही परिस्थिती वसई विरार शहर महानगरपालिका च्या नियंत्रणाबाहेर जात आहे.. जसे विरार आणि नालासोपारा येथे रुग्ण जास्तीच प्रमाणात होते आणि ह्याच भागत काही क्वारंटाईन सेंटर होते.. आणि ह्या भागांवर महानगर पालिकेला नियंत्रण मिळवता येत नसतानाच त्यांनी नवीन शहाणपणा करून जिथे अतिशय खूप कमी प्रमाणात रुग्ण असलेले वसई शहरातील जी जी कॉलेज येथे नवीन क्वारंटाईन सेंटर अगदी मोक्याच्या ठिकाणी गजबजलेल्या परिसरात चालू केले आहे.. इथे आणणारे रुग्ण हे जास्त करून विरार नालासोपारा येथील असून हे सर्व कोविड १९ पॉझिटिव आहेत. आता ह्यांना सांभाळ करणारे जी जी कॉलेज समोरील नर्सरी बाग येथील बहुतांशी कर्मचारी आहेत.. हा भाग लोकवस्तीच्या मानाने मोठा आहे… जर ह्या कर्मचारी पैकी एखाद्याला जर ह्या रोगाची लागण झाली आणि तो न कळत घरच्यांच्या किंवा इतर कोणाच्या संपर्कात आला तर पुढील घटना ही खूप भयावह असेल. तसेच पाचुबंदर येथील स्मशानभूमी ही कोविड १९ मृतकांसाठी वापरली जात आहे. परंतु येथे प्रेत जाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन असून सुद्धा लाकूड आणि डिजेल चां विनाकारण जास्तीचा खर्च का केला जात आहे..?? का त्या इलेक्ट्रॉनिक मशीन चा वापर केला जात नाही..?? तसेच येथे काम करणारे कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा किट दिली जात नाही, इथे कोणत्याही प्रकारचे निर्जंतुक औषध नाही आणि फवारणी पंप देखील नाही इथे ह्या कर्मचारी यांच्या जीवाशी खेळ करून त्यांना मरणासाठी वाऱ्यावर सोडले आहे का..?? इथे ही आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे.. तसेच येथे मासळी बाजार भरतो.. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते.. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही का..?? येथील स्थानिक रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत… घाबरले आहेत तसेच ह्या प्रकारामुळे संतप्त आहेत. हे का आणि कशासाठी होत आहे..?? की वसई साठी कोणी वालीच नाही आहे…?? की सर्व आमदार व व वि श महानगरपालिकेचे मुख्यालय विरार येथे असल्यामुळे तेथील रुग्ण वसई येथे पाठवले जात आहे..?? जर महानगरपालिकेला विरार नालासोपारा ची गंभीर परिस्थिती आधीच सांभाळता येत नाही आहे तर त्यात शांत असलेल्या वसईत हीच परिस्थिती निर्माण करण्याचं कारण काय…?? त्यात अचानक काही दिवसांपासून वसई गावातील सागरशेत पेट्रोल पंप येथे गटाराचे काम करण्यासाठी खोदकाम करून वाहतुकीचा मुख्य रस्ता बंद केला आहे.. अशा वेळी हाकेच्या अंतरावर असलेले पारनाका येथील सर डि एम पेटिट सरकारी रुग्णालय व जी जी कॉलेज येथे रुग्णांची अथवा मृतकांची ने – आण करणारी रुग्णवाहिका किंवा युद्धजन्य परिस्थितीत अत्यावश्यक सुविधा पुरविणारी अग्निशमन दलाचे वाहन यांची अतिशय कोंडी होत आहे… वाहतुकीस आजूबाजूने जाण्याचा प्रयत्न केले असता अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.. आणि अशा वेळी जर एखादी दुर्घटना झाली तर त्यास जबाब कोण..?? महानगरपालिका की इतर अजून कोणी..?? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.. तसेच वसईकरांना अजून किती मरण यातना सहन कराव्या लागतील असा प्रश्न पडतो आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *