

आज “जागतिक पर्यावरण दिनाचे” औचित्य साधून “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे दरवर्षी प्रमाणे सनसिटी येथून वृक्षारोणास सुरवात करून पर्यावरण दिन साजरा केला. खास करून 24 तास ऑक्सिजन पुरविणारे वडाची झाडे व पिंपळ, कडुनिंब ही झाडे लावण्यात आली.
आजचे वृक्षारोपण करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक, प्रसिद्ध पथनाट्यकार झुरान लोपीस व त्यांचे साथीदार डायगो दादा, KGN असोसिएशनचे अध्यक्ष कल्लन खान व त्यांचे सहकारी, मेकॅन्झी डाबरे, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे व माजी उपसरपंच सुनील डाबरे, अभिजित घाग, फारूक मुल्ला, कोरोना संकटात एखादया देवदूताप्रमाणे कार्य करणारे जोएल डाबरे, लिक्सन आल्मेडा, एझिकल डाबरे, तसेच विक्रांत चौधरी, विमलेश नाखवा, रानगावचे पर्यावरण संवर्धनातील आमचे सहकारी दिपक घरत , निशांत घरत व निलेश घरत, मॅक्सवेल रोझ या सर्वांनी मेहनत घेतली.