माजी नगरसेवकाचा पालिकेला सवाल  ?

विरार(प्रतिनिधी)-वसई विरार मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून छुप्या पध्दतीने औषधे बाहेर काढून त्यांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केला असून पालिकेने ६ वर्षात  खरेदी केलेली २५ कोटींची औषधे कुणाच्या पोटात गेली? असा सवाल उपस्थित केला आहे.पालिका रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेल्या औषधांचा काळाबाजार होत असल्याने रुग्णांना रुग्णालयात औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पालिकेच्या रुग्णालयातून रुग्णांना मोफत औषधे मिळावीत यासाठी दक्षता घेण्याची विनंती केली आहे.           वसई विरार मनपा द्वारा वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालय,नालासोपारा नगीनदास पाडा येथील मनपा रुग्णालय, तीन माता बालसंगोपन केंद्रे तसेच २१ आरोग्य केंद्रा मार्फत सेवा देण्यात येत आहे.शिवाय पालिकेच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी पालिके द्वारा मोठ्या तरतुदीही प्रस्थावित केल्या आहेत.त्यानुसार पालिकेने सन २०१४-१५ मध्ये १ कोटी ६९ लाख ७२ हजार, सन २०१५-१६ मध्ये १ कोटी ९० लाख ४२ हजार, सन २०१६-१७ मध्ये १ कोटी ७५ लाख ५२ हजार, सन २०१७-१८ मध्ये ५ कोटी, सन २०१८-१९ मध्ये ७ कोटी, सन २०१९-२० मध्ये ८ कोटी अशी २५ कोटी ३५ लाख ६६ हजार रुपयांची औषधे खरेदी केली.आधीच रुग्णालयात तसेच दवाखान्यात रुग्णांना औषधे मिळत नाहीत,त्यांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जाते.वैद्यकीय विभागाने ६ वर्षांमध्ये २५ कोटींची औषधे खरेदी केली परंतु ती रुग्णांना मिळाली का याचा ठोक ताळेबंद नाही. शिवाय पारदर्शकताही दिसून येत नाही.त्यामुळे २५ कोटींची औषधे रुग्णांच्या पोटात गेली? की अन्य कुणाच्या पोटात गेली याची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी आयुक्तांकडे केली आहे.तसेच मुळापर्यंत पोहचण्यासाठी व या प्रकणाचा तपास नेटाने करता यासाठी हे प्रकरण संवेदनशीलपणे घेण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *