
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 चा उपचार करताना कोणत्याही हॉस्पिटल चालकांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक करू नये बाबतच्या सर्व सूचना राज्यातील सर्व हॉस्पिटल चालकांना शासनातर्फे देण्यात आलेले आहेत.नालासोपारा येथील रहिवाशी निरज गुप्ता यांचे वडील विजयकुमार गुप्ता यांना कोविड 19 ची लागण झाली आहे असे सांगण्यात आले होते व त्यावर त्यांच्या उपचार सदर हॉस्पिटल मध्ये सुरु होता.कोरोना विषाणू वर उपचार करण्यासाठी रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चालकांनी निरज गुप्ता यांच्याकडून एकूण 9,50,0000/- रुपये घेतले व आणखीन पैशाची मागणी करू लागले.त्यावेळी निरज म्हणाला की माझ्याकडे पैसे नाही मला माझे घर विकून तुम्हाला पैसे द्यावे लागेल त्यानंतर 19 तारखेला तेथील डॉक्टरांनी विजयकुमार गुप्ता यांना मृत घोषित केले.त्या हॉस्पिटल मधील एक कर्मचाऱ्यारी निरज गुप्ताला म्हणाला की, तुम्ही दोन दिवस कुठे होता तुमचे वडील 2 दिवस अगोदर मयत झाले आहेत तेव्हा निरज गुप्ताला कळाले की त्यांच्या वडिलांचा मृत्यू 2 दिवस अगोदर झाला होता माझ्याकडून पैसे काढण्यासाठी डॉक्टरांनी जाणून बुजून माझ्या वडिलांना 2 दिवस व्हेंटिलेटर वर ठेवून असे भासविले की ते जिवंत आहेत सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा आहे या प्रकरणाची चौकशी करावी व मला न्याय मिळवून द्यावे अशी निरज गुप्ता यांची मागणी आहे.सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तेथील सदरची रक्कम यांनी त्यांचे वडील विजयकुमार गुप्ता यांना कोरोनाचा उपचार करण्यासाठी महानगरपालिकेच्या सांगण्यावरून दाखल केले होते.तेथील हॉस्पिटल चालकांनी निरज गुप्ता यांच्याकडून कोरोनाचा उपचार करण्यासाठी एकूण 9,50,000/- रुपये घेतले आहे.कोरोनाचा उपचार हा शासनातर्फे केला जातो याची माहिती निरज गुप्ता यांना नव्हती त्यामुळे हॉस्पिटल चालकांनी निरज गुप्ता यांची आर्थिक फसवणूक केली आहे तसेच निरज गुप्ता यांचे वडील हे सदर हॉस्पिटल मध्ये दिनांक 17/05/2020 रोजी मयत झाले आहे असे तेथील एका कर्मचाऱ्याने निरज गुप्ता यांस सांगितले होते व सदर रिद्धी विनायक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी 19 तारखेला मयत झाले असल्याचे निरजला सांगितले त्यामुळे हॉस्पिटल चालक यांच्या कामावर संशय निर्माण होत आहे निरज गुप्ता यांची तक्रार आहे की यांचे वडीलांचा निधन 17 तारखेला झाला होता ते डॉक्टरांनी लपवून ठेवले आमच्याकडून पूर्ण रक्कम घेतल्यानंतर 19 तारखेला मयत झाले असे आम्हाला सांगितले आहे आमची आर्थिक फसवणूक केली गेली आहे अशी निरज गुप्ता यांची तक्रार आहे.सदरचा प्रकार व हॉस्पिटलमधील कारभार संशय निर्माण करणारा आहे तसेच कोविड 19 चा उपचार हा शासनातर्फे होत असल्याने एवढे पैसे घेणे ही पद्धत लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.सदरची घटना ही नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली असल्याने निरज गुप्ता यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्याची फिर्याद घेवून संबंधित हॉस्पिटल चालकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात
यावे व पीडित निरज गुप्ता व त्यांच्या कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यात यावे अशी बहुजन महापार्टीची मागणी असून याबाबत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्याचे गृह मंत्री अनिलजी देशमुख व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्याकडे पत्र व्यवहार केले असून तात्काळ गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.तसेच वसई विरार परिसरात अनेक हॉस्पिटल चालक अशाच प्रकारे नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याने या परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवावा कोणालाही घाबरण्याचे कारण नाही बहुजन महापार्टी तुमच्या सोबत आहे ज्या ज्या लोकांची आर्थिक फसवणूक हॉस्पिटल चालकांनी कोरोना या आजारावर उपचार करण्यासाठी घेतले आहे त्यांचे पैसे परत करावे अन्यथा संबंधित हॉस्पिटल चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शमसुद्दीन खान यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे.