पालघर दि.12. : जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठया प्रमाणात वाढत आहे . या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रामधील ( Containment Zone ) अत्यावश्यक सेवा वगळून इतर हालचाली बंद करण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील तालुक्यातील नगरपरिषद , नगरपंचायत व गावातील प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले.
या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यासाठी डॉ.कैलास शिंदे , जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी महेंद्र वारभुवन , मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. पालघर , . दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक पालघर , डॉ . किरण महाजन , निवासी उपजिल्हाधिकारी , श्री . माणिक दिवे , प्रकल्प संचालक , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पालघर , डॉ.कांचन वानेरे , जिल्हा शल्य चिकीत्सक पालघर व डॉ.दयानंद सुर्यवंशी , जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर हे उपस्थित होते .
पालघर :- बोईसर , खैरापाडा व दातिवरे
, वसई :- कळंब , अर्नाळा
,डहाणू :- डहाणूगांव ( दिवादांडी , सोनपूर )
वाडा :- खरीवली , किरवली , वाडा , चिंचघर व देवळी
,विक्रमगड :- सुकसाळे , विक्रमगड व डोल्हारी
वरील प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीकोनातून सतर्क राहून खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केले .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून देशामध्ये व राज्यामध्ये लागू केलेली टाळेबंदी ( लॉकडाऊन ) टप्पानिहाय शिथील करणेत आली आहे . तरी लोकांनी त्यांच्या कामाच्या , नोकरीच्या व अत्यावश्यक बाबींच्या व्यतिरीक्त घराबाहेर पडू नये . तसेच जिल्हयातील समुद्र किनारे , धबधबे , पर्यटन स्थळे व खुली मैदाने याठिकाणी अनावश्यक फिरु नये . खुल्या जागेमध्ये अनावश्यक गप्पा मारत बसणे किंवा शहरात – गावात अनावश्यक गर्दी या सारख्या बाबी कटाक्षाने टाळण्यात याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *