विरार (प्रतिनिधी): मोबाईल व कम्प्यूटरचा लहान मुलांच्या दृष्टिआरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन’ अभ्यासाची सक्ती नको; अशी मागणी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी शालेय शिक्षण मंत्रालयाकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे.

मुले सातत्याने मोबाइल आणि कम्प्यूटरवर असल्याने याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो. शिवाय त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.

दरम्यान; सरकारने खासगी शिकवणी घेण्यास बंदी केली असली तरी काही ठिकाणी खासगी शिकवणी सुरू आहेत. जर शाळाच सुरू नसतील तर या खासगी शिकवणी तरी कशाला? असा प्रश्न तसनीफ़ शेख यांनी उपस्थित केला आहे.

काही पालक या खासगी शिकवणीची फी द्यायला तयार आहेत; मात्र शाळेची फी देण्यास आढ़ेवेढे घेत आहेत. यावरही शालेय शिक्षण विभागाने विचार करण्याची गरज असल्याचे मत तसनीफ़ नूर शेख यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *