


पोलीस दलाचा सर्वसामान्य जनतेशी उत्कृष्ट जनसंपर्क व समन्वय राहावा याकरिता आम्ही आज दिनांक 13/06/2020 रोजी वसई पोलीस ठाणे हद्दीतील रानगांव या गावांस भेट देऊन “अभियान विश्वास” मोहिमे अंतर्गत पोलीस जनसंपर्क राबविण्यात आला.
सदर वेळी स्थानिक ग्रामस्थांना पोलीस हे तुमचे मित्र आहेत आणि ते तुमच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे पोलिसाबाबत भीती बाळगू नये. ग्रामस्थांच्या काही किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील तर त्या स्थानीक पातळीवर पोलीस पाटील, तंटामुक्त समिती, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे मार्फत त्यांचा निपटारा करणे. त्यांचे कडून तक्रारींचे निरसन न झाल्यास पोलीस ठाण्यात यावे. तसेच गावात शांतता राहावी, सुरक्षितता राहावी याकरिता सुशिक्षित तरुणांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा. पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करावे तसेच गावात कोणत्याही प्रकारचा अवैध्य धंदा चालणार नाही याबाबत सुजाण नागरिक म्हणून सदर बाबत पोलीस ठाण्यात कळवावे त्या बाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच दिनांक 16/04/2020 रोजी कासा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गडचिंचले चौकीपाडा प्रकरण अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवण्याबाबत तसेच कोणत्याही अनोळखी ईसमास चोर किंवा दरोडेखोर समजून मारहाण न करण्याबाबत सुचना दिल्या तसेच त्याबाबत पोलीस ठाण्यात माहिती देण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच कोरोना संदर्भात सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे याबाबत जनजागृती करण्यात आली.