

वसई, मनिष म्हात्रे : वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत गेल्या अडीच महिन्यांच्या लाॅकडाऊन काळात अनाथ,बेसहारा तसेच मनोरूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.पालिकेने अतिरिक्त अकरा ठिकाणी तात्पुरत्या निवारा केंद्राची उभारणी केली होती ती देखील आता बंद करण्यात आली आहे.सद्या पापडी व विराटनगर अशी दोन निवारा केंद्र असून जून महिन्यात वालिव व वालईपाडा येथे नवीन दोन निवारा केंद्र बनविण्यात येणार आहेत.मात्र या निवारा केंद्रात नेण्यात न आल्यामुळे बृधवारी संध्याकाळी वसईत एका 60 वर्षीय मनोरूग्ण महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.पालिकेच्या दुर्लक्षपणा व भूकेमूळे या मनोरूग्ण महिलेचा बळी गेल्याचा आरोप नागरीक आता करीत आहेत.
वसई विरार महानगरपालिका पालिका क्षेत्रात पापडी व विरार येथील विराटनगर येथे पालिकेचे निवारा केंद्र आहे.या निवारा केंद्रात शहरातील रस्त्यावरील मनोरूग्ण, अंनाथ व अपंगांना दाखल करण्यात येते.तेथे त्यांची दोन वेळा जेवण,आंघोळ, स्वच्छ कपडे,तसेच उपचार करण्यात येतात.मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रलाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर शहरातील मनोरूग्णांसह अंनाथ व बेसहारा लोकांची संख्या वाढत असल्यामूळे पालिकेने तात्पूरती 11 नवीन निवारा केंद्र बनवली होती.नालासोपारा पश्चिम वाॅर्ड क्रमांक 56 नाळा येथे मे महिन्यात चार मनोरूग्ण आढळून आले होते.त्यात दोन पुरूष व दोन महिला मनोरूग्णांचा समावेश होता.स्थानीक नागरिकांनी पालिकेला कळविल्यानंतर त्यातील दोन पुरूष मनोरूग्णांना निवारा केंद्रात दाखल करण्यात आले ,मात्र इतर दोन महिला मनोरूग्णांना निवारा केंद्रात नेण्यात आले नव्हते.ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही पालिकेने त्यांना नेले नसल्याची माहिती सामाजीक कार्यकर्ते दिपक म्हात्रे यांनी दिली.त्यानंतर दयाबूद्धीने माणूसकीच्या नात्याने त्या महिलांना अन्न व कपडे लोक देत होते. महिला मनोरूग्णांना या कोरोना महामारीची माहिती नसल्यामुळे ते तोंडाला मास्क , रूमाल बांधत नसल्यामुळे दिवसभर गावा-गावात फिरत असतात.त्यामूळे ते कोरोना संक्रमित होण्याचा संभव उद्भवतो होता.त्याच प्रमाणे महिला मनोरूग्णांची मानसिक स्थीती ठिक नसल्यामुळे उद्या एखादा तीच्याबाबतीत अतिप्रसंग घडण्याचा प्रयत्नही होऊ शकतो अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.यादरम्यान 10 जून रोजी यातील एक 60 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह नाळा गावाच्या हद्दीबाहेर निर्मनुष्य ठिकाणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृत्यू भुकेने झाला की इतर आजाराने याच्या तपासासाठी नालासोपारा पोलिसांनी नमूने जेजे रूग्णालयात पाठवले आहेत.
मार्च ,एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात नालासोपारा पश्चिम शुर्पारक नगर, सी प्रभाग समिती कार्यालय,नवघर-माणिकपूर, नालासोपारा पश्चिम, वसई गांव,वालिव ,विरार,नालासोपारा पूर्व,सोपारा महामार्ग,विरार पूर्व व नालासोपारा जिल्हा परिषद शाळा व जिवदानीनगर विरार पूर्व याठिकाणी हि तात्पूरती निवारा केंद्र बनविण्यात आली होती.या निवारा केंद्रात विस्तापीत झालेले किंवा उपासमार होत असलेले कामगार व मजूर यांना भोजन ,निवारा व वैद्यकीय मदत देण्यात येत होती.एप्रीलच्या पहिल्या आठवड्यात तेरा निवारा केंद्रात तब्बल 688 लोकांना तात्पूरते ठेवण्यात आले होते.दहा दिवसानंतर त्यात घट होऊन 285 लोक आश्रयाला होते.मात्र 20 मे नंतर पालिकेने उर्वरीत 11 निवारा बंद करण्याचा निर्णय घेतला .सद्या पापडी येथे 13 व विराटनगर येथे 58 जणांना निवारा केंद्रात ठेवले असून वालिव व वालाईपाडा येथे नव्याने दोन निवारा केंद्र बनविण्यात येणार असल्याची माहिती निवारा केंद्र शहर व्यवस्थापक विभा जाधव यांनी दिली.
अहमदाबाद येऊन आलेली शबाना मुस्तफा शेख का बनली मनोरूग्ण ?…
शबाना मुस्तफा शेख हि 35 वर्षीय तरूणी मुळची राहणारी अहमदाबाद येथील.मार्च महिन्यात तीच्या आईचे निधन झाल्यावर ती आपल्या चार लहान बहिनींना घेऊन सुरत येथील मावशी फरीदाकडे आश्रयाला आली.मात्र मावशीच्या नव-याची वाईट नजर तिच्यावर पडल्यामुळे फरीदा मावशीने चार बहिणींना आश्रयाला ठेऊन शबानाला नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर काढले.मिळेल ती गाडी पकडून ती मूंबईच्या दिशेने निघाली.विरार स्थानकात मेलमधून उतरल्यानंतर ती लोकलने नालासोपारा येथे आली.याच वेळी लाॅकडाऊन सुरू झाले.हातात पैसे नाहित,राहायला निवारा नाही ,भूकेने जीव व्याकूळ झाल्यावर तीने भीक मागायला सुरूवात केली. शहरातील लोकांनी हाकलल्यावर ती वणवण फिरत नाळा गावातील एका तलावाकाठी आश्रयाला आली.हि महिला वेडी नाही हे समजल्यावर स्थानिकांनी तीला माणूसकीच्या नात्याने जेवण व कपडे दिले.महिला असल्याने तिच्याबाबत कासी अघटीत होऊ नये म्हणून तीला निवारा केंद्रात नेण्यात यावे अशी पालिकेकडे ग्रामस्थ मागणी करत आहेत.सद्या शबानाची मानसीक स्थीती बदलत चालली असून तीच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर लवकरच मनोरूग्ण बनेल अशी भिती वर्तवण्यात येते होती.पालिकेने शेवटी गुरूवारी संध्याकाळी शबानाला विराटनगर येथील पालिका निवारा केंद्रात दाखल केले.
1) वसई विरार शहरातील निराधार व मनोरूग्णांना पालिकेच्या दोन निवारा केंद्रात ठेवण्यात येते.तेथे भोजन ,निवास व वैद्यकीय सेवा देण्यात येते.निवारा केंद्राची संख्या आणखीन वाढविण्यात येणार आहे.
– गंगाथरन डी, आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका