अन्नपाणी वाटपासाठी स्वस्तिक सेवा संस्थेचा पुढाकार!

मुंबईतून स्थलांतरितांना तसेच मजुरांना आपल्या गावी पाठवण्यासाठी अभिनेता ‘सोनू सूद’ हा कार्यरत असून आत्ता तो वसईतील स्थलांतरितांच्या हाकेला धाऊन आला आहे. सोनु सूद च्या या कार्यात सेवाभावी हातभार लावण्यासाठी वसईतील स्वस्तिक सेवा संस्थेने पुढाकार घेतला आहे.

दिनांक ११ जून रोजी रात्री १० वाजता वसई रोड रेल्वे स्थानकातुन १२०० मजुरांना घेवून श्रमिक स्पेशल ट्रेन सुल्तानपुर ला रवाना झाली.सदर ट्रेन सोडण्यासाठी अभिनेता‘ सोनू सूद’ च्या मदतीने व खासदार राजेन्द्र गावित, जिल्हाधिकारी कैलास शिंदे व तहसीलदार वसई किरण सूरवसे यांच्या प्रयत्नाने व सहकार्याने सोडण्यात आली.

बॉलीवुड मधे खलनायक च्या रूपात प्रसिद्ध असलेला ‘सोनू सूद’ हा लॉक्डाउन मधे मात्र ‘नायकाच्या’ भूमिकेत सर्वत्र दिसत असून प्रसारमाध्यमातून त्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सदर ट्रेन मधुन जाणाऱ्यामजुरांसाठी ‘स्वस्तिक सेवा संस्था, वसई तर्फे जेवणाचे, पीण्याच्या पाण्याचे तसेच बिस्किट, ओआरएस व लहानांसाठी ऑरेंज जूस चे वाटप करण्यात आले.

‘स्वस्तिक सेवा संस्था’ वसई, ही या लॉक्डाउन मधे सतत सेवाभावी कार्य करत असून संस्थेचे कार्यकर्ते विजय शर्मा, अशोक पुरोहित, हरीश, अजय शर्मा ,अमित, चंद्रकांत शुक्ला, भडकु, दीपक क़हर, महेन्द्र, शेखर अग्रवाल व इतर कार्यकर्ते सतत जोमाने कार्यरत करत आहेत.
सोनु सूद टीमचे तसेच स्वस्तिक सेवा संस्थेचे आभार मजुरांनी मानले असुन सोनु सुद बरोबरच स्वस्तिक सेवा संस्थेचे वसईत सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *