


गेल्या कित्येक दिवसांपासून सागर शेत पेट्रोल पंप, वसई येथे
सुरू असलेले गटाराचे बांधकाम रहदारीच्या मुख्य रस्त्यावर सुरू आहे.. त्यामुळे पदाचारी व वाहनांची ये – जा करताना मोठी पंचायत होत असून त्यांना पर्यायी रस्ता म्हणून मोठा वळसा घालून जावे लागत आहे.. ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत..ही बातमी वारंवार युवाशक्ती एक्सप्रेस मध्ये छापून येत आहे त्यामुळे व वि श महानगरपालिका यांनी ह्या बाबत विशेष लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सागर शेत पेट्रोल पंप शेजारी असलेल्या शेत जमिनीतून तात्पुरता बांधकाम पूर्ण कच्चां रस्ता मोकळा करून दिल्यास सर्वांची व्यवस्थित सोय होणार आहे… तसेच सदर जमीन ही व वि श महानगरपालिका च्या विकास आराखड्यात समाविष्ट आहे. त्यामुळे महानगरपालिकेला कोणतीही अडचण नाही, त्यामुळे रस्ता पूर्ण तयार होईपर्यंत शेजारील शेत जमिनीतून ये – जा करण्याकरिता रस्ता मोकळा करून लोकांची ये – या करण्यासाठी सोय करण्यात हवी.. अशी मागणी वजा पत्र आपला वसईकर श्री सुशील ओळगे यांनी व वि श. महानरपालिका प्रभाग समिती आय चे प्रभारी सह आयुक्त श्री सुभाष जाधव यांच्या ह्यांच्या कडे केली आहे
