

वसई : भाजपा वसई रोड मंडळाकडून आज उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नालासोपारा पूर्व येथील विजयनगर येथील वसई विरार शहर महानगर पालिकेच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यामध्ये वसई रोड मंडळाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू तसेच जेवणाचे पॅकेट्स, मास्क, तसेच मायग्रँट वर्कर्सना मोठ्याप्रमाणात आपआपल्या गावी जाण्याची सोय आदी अनेक कामे करण्यात येत आहेत. असे उत्तम कुमार यांनी सांगितले.
यावेळी भाजपा नालासोपाऱ्याचे सरचिटणीस मनोज बारोट, वसई रोड मंडळ उपाध्यक्ष रमेश पांडे, भाजपा युवा पदाधिकारी अभय कक्कड , सतेंद्र रावत आदी उपस्थित होते.