
कारवाई करण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ ?
वसई /वार्ताहर: सत्पाळा ग्रामपंचायत कार्यालया समोरील व्यापारी गाळ्यांसाठी असलेले शौचालय अज्ञातांकडून जमीनदोस्त करण्यात आले आहे.त्यावर कारवाई करण्यास ग्रामसेवकाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सत्पाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायतीने दहा व्यापारी गाळे उभारले आहेत.हे गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. सुमारे वीस वर्ष जुने असलेल्या ह्या गाळयासाठी काही वर्षांपूर्वी एक शौचालय उभारण्यात आले होते.हे शौचालय काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून जमीनदोस्त करण्यात आले आहे.त्यामुळे येथील दुकानदारासह त्यात काम करणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे.
शौचालय कोणी उध्वस्त केले अशी विचारणा केल्यावर ग्रामसेवक केशव पिंपळे यांनी हात वर केले असून मला काही माहीत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.तर यावर कार्यवाही करायची जबाबदारी सरपंचांवरही असते त्यांना सांगा असे उत्तर बीडीओ भरत जगताप यांनी दिले. त्यामुळे सरपंच अनिल ठाकूर यांच्याशी एका महिला पत्रकाराने संपर्क साधल्यावर तुम्हाला कळले तर तुम्ही गुन्हा दाखल करा अशी उद्दाम उत्तर ठाकूर यांनी दिले