आज आपल्या किलबिल सामाजिक संस्था परिवारातर्फे जनतेचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाना फेस प्रोटेक्टर (FACE PROTECTOR) देण्यात आले.
यावेळी वसई पोलीस ठाणे, माणिकपूर पोलीस ठाणे, वसई पोलीस वाहतूक शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा, वसई येथील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हे फेस प्रोटेक्टर पुरविण्यात आले. यावेळी आपल्या किलबिल परिवारातर्फे समीर वर्तक , लिकसन आल्मेडा, एझिकल डाबरे, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे, माजी उपसरपंच आणि फेस प्रोटेक्टर उपलब्ध करून देणारे सुनील डाबरे, सामाजिक कार्यकर्ते व युवाभारतचे शशी सोनवणे, अभिजित घाग आणि दर्शन राऊत उपस्थित होते.
आपल्या किलबिल परिवार व युवा संस्थेच्या माध्यमातून कोरोनामुळे 24 मार्च पासून लोकडाऊन मुळे मागील 80 दिवसांत लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या संपुर्ण वसईतील 6000 पेक्षा अधिक गरजू कुटुंबियांना मोफत धान्यवाटप केले आहे आणि अजूनही हे धान्यवाटप अविरतपणे चालू आहे.
तसेच हाताला काम नाही त्यामुळे पोटात अन्न नाही . भविष्यात हाताला काम मिळेल ही आशाही नाही. मग करायचे काय ? इथे राहून हाल होण्यापेक्षा मिळेल ते साधन पकडून गावाला जायचे.
अश्या लोकांना जाताना प्रवासात पोटाची भूक शमवण्यासाठी आम्ही किलबिल परिवारामार्फत ट्रक, टेम्पो द्वारे गावाला प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान आणि गुजरात इ ० जाणाऱ्यांना फरसाण, चकली, पाणी, लहान मुलांसाठी बिस्किटे तसेच कधी चपाती देऊन सरासरी दिवसाला 1000 ते 1200 कधी त्यापेक्षाही जास्त जणापर्यंत आम्ही मदत पोहोचविली.
हे सर्वकाही शक्य झाले ते किलबिल सामाजिक संस्था परिवार व युवा संस्थेचे मेकॅन्झी डाबरे आणि दिवसरात्र मेहनत घेणारे जोएल डाबरे, माल्कम परेरा, रॉयल कोरिया, लिक्सन आल्मेडा , एझिकल डाबरे, ग्लॅडविन रॉड्रीग्ज , फ्रॅनसन लोपीस, रॉयडन, जॉर्डन, बाबू, एरॉन, रिया , सानिया यांनी किराणा सामान व फरसाण पॅकिंग पासून वाटपापर्यंत फार मेहनत घेत आहेत. आमच्यासोबत असलेले फादर बाप्टिस्ट लोपीस, adv अल्बर्ट डाबरे, प्रसिद्ध नाट्यकर्मी रॉबिन सर आणि समाज सेवा मंडळ हॉल कामासाठी विनामूल्य उपलब्ध करून देणारी मंडळाची समिती आहेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *