आज “जागतिक पर्यावरण दिनाच्या” निमित्ताने “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे “69 गावांची पाण्याची योजना” लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी निर्मळ येथील या पाणी योजनेतील रिकाम्या जलकुंभासमोर (पाण्याची टाकी) सकाळी “धरणे आंदोलन” करून जोपर्यंत आम्हा 69 गावातील नागरिकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील या घोषणेने आंदोलनाची सुरवात केली.
प्रसिध्द पथनाट्यकार व जेष्ठ रंगकर्मी झुराण लोपीस व त्यांचे सहकारी डायगो लोपीस व मॅक्सवेल रोझ यांनी आंदोलनपर गीतांच्या द्वारे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.
यावेळी पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक आणि आंदोलनकर्ते समीर सुभाष वर्तक, शशी सोनावणे, बसीन कॅथॉलिक बँकेच्या माजी अध्यक्षा डॉमिनिका डाबरे, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे व माजी उपसरपंच सुनील डाबरे, आदिवासी एकता परिषदेचे वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे, उपाध्यक्षा वंदना जाधव, सचिव प्रकाश जाधव व सहकारी, स्वाभिमानी वसईकर संस्थेचे अध्यक्ष जॉन परेरा, प्रहार संघटनेचे हितेश जाधव व सहकारी, ध्यास फाउंडेशनचे यशवंत कुलकर्णी व सुरेखा चंद्रकांत कुलकर्णी, मॅकेन्झी डाबरे,मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर, विमलेश नाखवा, विक्रांत चौधरी, रानगावचे माजी उपसरपंच श्रीरंग मेहेर,जेष्ठ कार्यकर्ते खंडू मास्तर, कवी फेलिक्स डिसोझा व कवी इग्नेशिअस डायस, अभिजित घाग, दर्शन राऊत, अजित सुर्वे, कुंदन नाईक, प्रा. प्रसाद डाबरे, अॅलन डिसोझा, जोएल डाबरे, डेरिक फुर्ताडो, बावतिस फिगेर, जॉल्डन दालमेत तसेच प्रामुख्याने भुईगाव, वाघोली, निर्मळ, गास परिसरातील आणि संपूर्ण वसईतूनअनेक जेष्ठ व तरुण कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *