

बॉयकोट चायना प्रॉडक्ट्स च्या घोषणा!
वसई : लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याने केलेल्या हिंसाचाराचे पडसाद संपुर्ण देशभरात पसरू लागले आहेत. बॉयकॉट चायना अशी भावना भारतीयांमध्ये येऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा वसई रोड मंडळाने कोरोनाचा वाढता धोका पाहता. सोशल डिस्टनसिंग चे पालन करत. उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वसई स्टेशन अंबाडी नाका येथे चीन वस्तू माल व केलेल्या हल्ल्या विरोधात निदर्शन करत आपला निषेध नोंदवला व शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. “बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स”च्या घोषणा दिल्या.
यावेळी भाजपा वसई रोड मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आयोजक उत्तम कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, शहीद झालेल्या जवना प्रति आपण आदर ठेऊन आपण देशाचे पंतप्रधान यांनी सांगितल्या प्रमाणे आत्मनिर्भर होऊन याचा लढा दिला पाहिजे त्याशिवाय चीनला अद्दल घडणार नाही. असे ते म्हणाले. दोन रेषांपैकी जर आपली रेषा लहान असेल तर दुसरी रेषा खोडण्याचा प्रयत्न न करता आपली रेषा कशी मोठी करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. जेवढ्या जास्तीतजास्त प्रमाणे आपल्याला आत्मनिर्भर कसे बनत येईल हे पहिले पाहिजे व भारतीय नागरिक म्हणून चीनच्या मालावर बहिष्कार घालून प्रत्येकाने या राष्ट्रीय लढ्यात सामील व्हावे असे आवाहन केले.
यावेळी भाजपा प्रदेश प्रतिनिधी चंद्रशेखर धुरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश दामनकर, विश्व हिंदू परिषदेचे रवी निकम, रमेश पांडे, संजय सिंग, मनोज चोटलीया, कल्पेश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यां सोबत मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. बजरंग दल जिल्हा संयोजक देवेंद्र जेयना यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले तर रामनुजम यांनी सूत्रसंचालन केले.
