मोबाईलवरील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना डोळेदुखी, डोकेदुखीचा त्रास !

वसई : (प्रतिनिधी) : छडी लागे छमछम, विद्या येई घमघम अशी वाक्य कानी पडली ककी, जून महिना सुरू झाला म्हणून समजायचे. याच महिन्यात मस्त दोन-अडीच महिन्यांची वार्षिक सुट्टी घेऊन विद्यार्थी शाळेत दाखल होत असतात. यंदा कोरोनासारख्या जागतिक आपत्तीने विद्यार्थ्यांसहित अवघ्या जगालाच वेठीला धरले आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून इंग्रजी माध्यमांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे प्रयोजन आखण्यात आले आहे. ऑनलाईन शिक्षणाची कल्पना युद्धपातळीवर असताना या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढत चालल्याचे चित्र समोर आले आहे. बर्‍याचशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे आकलन होत नाही. शिक्षक ऑनलाईनवर विद्यार्थ्यांना एकत्र शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. त्यात मुलांचा गोंधळ होतो. या कारणांबरोबरच सतत दोन ते तीन तास मोबाईलच्या स्कीनवर पाहत राहील्यामुळे विद्यार्थ्यांना डोळे व डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आहे. या सर्व कारणांचा विचार करता ऑनलाईन शिक्षणाचा कसा गोंधळ सुरू आहे ते प्रकर्षाने समोर आले आहे.
शिक्षणासारख्या क्षेत्रात सुरू असलेली स्पर्धा लक्षात घेता बरेचसे पालक आपली मुलं मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमात दाखल करत आहेत. यातील बरेचसे पालक असे असतात जे रोजंदारीवर काम करून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवत असतात. आधीच इंग्रजी माध्यमांकडून पालकांची होत असलेली आर्थिक लूट सर्वसामान्य पालकांचे कंबरडे मोडू लागली आहे. मात्र आपल्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून ही सर्वसामान्य मंडळी त्यांना इंग्रजी माध्यमांत दाखल करतात. आत्ताच्या कोरोना आपत्ती काळात ऑनलाईन शिक्षणामुळे यातील बर्‍याचश्या पालकांकडे चांगले मोबाईल नसल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून उसणवारी पैसे घेऊन ते आपल्या मुलांना मोबाईल विकत घेऊन देत आहेत. आधीच कोरोनामुळे हातचा रोजगार हिरावलाय. खाण्या-पिण्याची आबाळ झालीय. त्यात ऑनलाईन शिक्षणाचं खर्चिक भुत सर्वसामान्य पालकांच्या मानगुटीवर बसविले गेले आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा येऊ लागल्या आहेत. नेटर्व नसणे, आवाज निट न येणे, मुलांचा गोंधळ, शिकवलेले निट आकलन न होणे तसेच सतत मोबाईलकडै पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांना होत असलेला डोळे व डोकेदुखीचा त्रास पाहता या ऑनलाईन शिक्षणाचा पुरता गोंधळात गोंधळ आहे.

फि माफीसाठी आम्ही नायगावकरांची स्वाक्षरी मोहीम
आधीच कोरोना आपत्तीत हाती रोजगार नसल्याने जगण्यासाठी धडपड करणार्‍या नागरिकांवर शाळा व्यवस्थापनांकडून फी भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. जोपर्यंत फी भरली जात नाही, तोपपर्यंत पुस्तके दिली जाणार नाहीत, असे प्रकार शाळा व्यवस्थापनांकडून सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नायगाव पूर्व परिसरात हा प्रकार सध्या काही शाळा व्यवस्थापनांनी सुरू केला आहे. याप्रकरणी येथील साई मित्र मंडळ पुरस्कृत आम्ही नायगावकरतर्फे लॉकडाऊन संपेपर्यंत पालकांकडे फी साठी तगादा लावू नये तसेच फी माफीसाठी व फी त सवलत देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत 2 हजार पालकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत, याबाबत आम्ही नायगावकर संस्थापक, अध्यक्ष चेतन घरत यांनी आमदार हितेंद्र ठाकूर व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन फी माफीचे अर्ज सदर करणार आहेत, शेवटी सरकार जो निर्णय देईल तो मान्य असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *