

वसई /वार्ताहर : महाराष्ट्र आणि उत्तराखंड सरकारच्या प्रयत्नातून मुंबई टू उत्तराखंड ट्रेन सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र आणि उत्तराखंड सरकार द्वारा श्रमिक ट्रैन सुरु करण्यात आली होती.२६ तारखेला तिसरी ट्रैन मुंबई कुर्ल्यातून सोडण्यात आली होती. त्या नंतर २८ तारखेला एक ट्रेन पालघर जिला, ठाणे, नवी मुंबई, मीरा- भाईंदर मधील प्रवाशांसाठी ठाण्यातुन उत्तराखंडला जाणार होती. उत्तराखंड सरकार कडून NOC न मिळाल्याने ही ट्रेन रद्द करण्यात आली होती. प्रवासी टीम द्वारे नैनिताल उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.या मागणीसाठी टीमच्या सदस्या श्र्वेता मासीवाल यांनी नैनीताल उच्च न्यायालयात तशी मागणी केली होती. १५ जून ला न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई उत्तराखंड अशा श्रमिक एक्सप्रेसला उत्तराखंड सरकार कडून हिरवा कंदील दाखवण्यात आला.प्रवासी सहयोगी टीमने त्यासाठी अथक प्रयत्न केले होते.
मुंबई ते उत्तराखंड अशी थेट गाडी नव्हती. त्यामुळे मुंबईतील उत्तराखंडी नागरिकांना मुंबई ते दिल्ली किवा सहारनपुर वरून उत्तराखंड असा या कोरोना महामारीत उलट प्रवास करावा लागत होता. गेल्या आठवड्यात १६ जूनला ठाणे ते लाल कुंआ अशी श्रमीक ट्रेन ९७२ उत्तराखंडी प्रवाशांना घेऊन रवाना झाली.यावेळी कोस्टल इंडिया,अक्षय पात्रा,लीड,राहुल कनान फाऊंडेशन, उत्तरांचल वेल्फेयर एसोसिएशन, युनिसेफ व जीवन रथ पोस्ट ट्रॅव्हल रिलीफ टीम काफल फाउंडेशन देवभूमी सांस्कृतिक कला मंडळ ठाणे आणि हरिष दसोनी यांनी यांनी या प्रवाशांच्या खानदानाची व्यवस्था केली.
त्यामुळे आनंदी झालेल्या उत्तराखंड नागरिकांनी दोन्ही सरकारचे तसेच कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांचे विशेष आभार मानले आहेत.
टिमचे कुंदन गरीया, नरेंद्र राजपूत, नवीनचंद्र भट, प्रदीप रावत,सुधाकर थपलियाल, हर्षवर्धन मनराल, दिलीप बिस्ट, ब्रिजेश रावत, मोहन चंद्र जोशी, कैलास उदय चंद, गजेंद्र रावत, दिलीप बिष्ट, पप्पू बर्थवाल, मेडी रावत, दान सिंह राजपूत, दिनेश अंथवल, केदार जोशी, मोहन मेहरा,महेंद्र गुसाई, व इतर सामाजिक कार्यकर्ता यांनी या गाडीसाठी विशेष परिश्रम घेतले. त्यासाठी गोपाल गोस्वामी,ॲड. दुष्यंत म्हनाली,अपूर्व जोशी, साहिल जोशी,ॲड. गोपाल शंकर नारायण, ऑल इंडिया फॉरवर्ड चे राष्ट्रीय महासचिव देवव्रत विश्वास, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रामेश्वर चोण्डा यांनी टीमला विशेष मार्गदर्शन केले