

शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
आज वसई मध्ये जिल्हाध्यक्ष राजारामजी मुळीकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रतिमेला जोडे मारत घोषणा देत आंदोलन केले.
‘मी भाजपचा दलाल’ अशा आशयाचे पोस्टरवर लिहून त्यावरील आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळ्याला राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनीजोडे मारत आणि जोरदार घोषणाबाजी करत वसई पश्चिम )बस डेपो येथे हे आंदोलन केले.