

(दि.२६, प्रतिनिधी मनोज बुंधे)
वाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सींग चे पालन करून तथा सॅनिटायजर चा सुयोग्य वापर करून आज खुपरी येथील महात्मा फुले नगर मधील मध्यवर्ती तीन रस्ता ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.शाहू महाराजांनी आपल्या शासन काळात नेहमी बहुजनांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.ते एक उत्तम शासक,सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,तसेच लोकराजे होते.
प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखेचे अध्यक्ष सुजय जाधव, संघटक प्रदीप जाधव, आंबेडकरी कार्यकर्ते जगदीश जाधव, नारायण हुमणे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महिला वर्गाकडून दीप व धूप प्रज्वलित करण्यात आले. तसेच खुपरी फुले नगर मधील जाधव, ताठे, हुमणे, खोब्रागडे परिवारांकडून महाराजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.