

वसई(प्रतिनिधी)-सध्या चर्चेत असलेल्या आयुक्त गंगाधरण डी.यांनी पालिकेतील एका पदवीधर महिला कर्मचाऱ्याला स्वतः च्या निवासस्थानी घरगुती कामांसाठी जुंपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.योगिता राऊत असे त्या माहिला कर्मचाऱ्याचे नाव असून काल तीने एक पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडल्या.योगितानेआता
जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.या पत्रकार परिषदेत मी दलित समाजाची असल्याने मला जाणीवपूर्वक अशा प्रकारचे काम देऊन अन्याय केल्याचा आरोप योगीताने केला .योगिता राऊत (जाधव) या सुरवातीला वसई विरार पालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयात अनुकंपा तत्वावर सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाल्या होत्या. मात्र तिची शैक्षणिक
पात्रता व काम लक्षात घेऊन योगीताला लिपिकाचे काम दिले होते.दरम्यान वसई विरार पालिकेच्या आयुक्त पदाचा भार गंगाथरण डी. यांच्याकडे सोपविण्यात आला.नव्याने नियुक्त झालेल्या गंगाथरण डी. यांनी १८मे रोजी योगिता राऊत व अन्य दोन महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मर्जीविरोधात वैयक्तिक कामासाठी ते राहत असलेल्या घरात घरकाम करण्यासाठी बोलवले व त्यांच्याकडून भांडी, कपडे धुण्याचे, झाडू पोछा करण्याचे,मासे सुटे करण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप योगिता राऊत (जाधव) यांनी आयुक्तांवर केला आहे.विशेष म्हणजे बंगल्यावर काम करण्यासाठी पाठवणी करते वेळी पालिकेने कोणतेही नियुक्ती पत्र योगिताला दिले नाही. यावरून पालिकेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सदर प्रकाराबाबत योगीताने वरिष्ठ अधिकारी, एस. आई. विकास पाटील यांना सूचित केले होते.पण पाटील यांनी त्यांच्या सदरच्या तक्रारीकडे लक्ष न देता मला अधिकार नाही असे सांगून या बाबी आयुक्त यांना भेटून वैयक्तिक स्तरावर सोडवण्याचा सल्ला देत
दुसऱ्या दिवशी योगिताला कोविड १९ आयसोलाशन केंद्र जी.जी. कॉलेज वसई येथे काम करण्यास सांगितले व कोरोना रुग्णांच्या चादरी, भांडी व संडास साफ करण्याचे काम करून घेतले.यावरून पालिका अधिकाऱ्यांची दलितांविषयी मानसिकता दिसून येते.यासंदर्भात योगिता यांनी स्थानिक पोलीस ठाणे, महापौर तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्याकडे न्यायासाठी मदत मागितली होती मात्र तिला कोणीही न्याय दिला नाही.दरम्यान योगितावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वप्निल डीकुन्हा,डॉ. भरतभूषण वर्मा यांनी सामाजिक माध्यमातून आवाज उठवला व उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.उच्च न्यायालयाने यासंदर्भात टिप्पणी करताना म्हटले आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला ठरवून दिलेले कामच त्याला देण्यात आले पाहिजे.परंतु पालिकेने कोणतेच नियुक्तीचे आदेश न देताच परस्पर आयुक्तांच्या बंगल्यात खाजगी कामासाठी पाठवले.आयुक्तांच्या अशा मनमानी पणा विरोधात आता योगिता जनतेच्या न्यायालयात दाद मागणार असून आपल्या वरती झालेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडणार आहे. तसेच कामगार व कामगार आयुक्त यांच्याकडे देखील त्या आपली व्यथा मांडणार आहेत.
कामावर अनुपस्थित राहिल्याबद्दल योगीताला पालिकेची नोटीस !
दुसरीकडे पालिकेचे सहा.आयुक्त सुभाष जाधव यांनी योगीतावर दबाव टाकत
कामावर अनुपस्थित राहिल्याबद्दल नोटिस बजावली आहे.या नोटीसी द्वारे योगीताला साफसफाई च्या कामांकरिता तात्काळ जी. जी कॉलेज मध्ये उभारलेल्या आयसोलेश केंद्रात रुजू होण्यास सांगितले आहे.तसेच गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीद दिली आहे.त्यामुळे सुभाष जाधव यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे.
मला रुग्णालयात सेवा करण्यासाठी नियुक्त केले होते. परंतु कोणताही रितसर आदेश न देता सहा. आयुक्त सुभाष जाधव यांनी मला आयुक्तांच्या बंगल्यात जाण्यास सांगितले.त्या ठिकाणी माझ्याकडून वेठबिगारी सारखे कामगिरी करून घेतली.ते काम करण्यास मी विरोध केला म्हणून मला हेतुपुरस्सर कोरोना संक्रमण विभागात काम करण्यास नियुक्त केले. याठिकाणी मला स्वसंरक्षणासाठी पर्याप्त वैद्यकीय साहित्य दिले नाही.आयसोलाशन केंद्रात मला बाथरूम साफ करणे, कोरोना संसर्ग झालेल्या लोकांच्या चादरी धुणे आदी धोकादायक कामे देत होते. त्यामुळे मला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती होती.मी माझं कर्तव्य समजून ती कामे सुध्दा केली.मात्र त्याठिकाणी माझ्या जीवाची कोणतीही काळजी पालिकेकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे मी अत्यंत भयभीत झाले आहे. सध्या मी आजारी पडली असून वैद्यकीय रजेवर आहे. परंतु आयुक्तांविरोधात तक्रार केल्याने मला कामावरून कमी करण्याची भीती आहे. मी माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात
आता जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहे. मी दलित असल्यानेच मला आयुक्त पदवीधर असूनही अशा प्रकारची वागणूक देत आहेत.
-योगिता राऊत(जाधव)
(तक्रारदार महिला)