

वसई (प्रतिनिधी) वसई विरार महानगर पालिका कडून सफाई कामगारांची फसवणूक चालवली आहे.लाँकडाउन च्या काळात सफाई कामगारांची वसई विरार माहानगर पालिकेला गरज होती.त्यावेळी एकुण १७० तरुणांना मनपाने सफाई कामगार म्हणून कामावर घेतले होते. लागोपाठ २महीने काम करुन आत्ता काम सरो ना कामगार मरो अशी दशा मनपाने चालवली आहे. मनपाने कोणत्याही प्रकारचे पुर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकण्याचे कारस्थान चालवले आहे.आपल्याला कामावरून काढण्याचे कारस्थान चालविले आहे.असे कामगारांना कळताच सर्व कामगारांमधे संताप पसरला आहे.ह्या सर्व कामगारानी अनेक वेळा मनपाच्या आयुक्तानां भेटुन न्याय मागण्याचा प्रयत्न केला.मात्र आयुक्ताना कामगारानां भेटण्याची वेळच भेटत नाही.असे सफाई कामगार आकाश लढें यांनी सांगीतले कामगाराना शेवटचा पर्याय निवडावा लागला तो सर्व कामगारांनी एकत्र येउन संघटित होउन संघर्ष करणे. सर्व सफाई कामगार एकत्र होउन आदिवासी एकजूट संघटने कडे न्याय मागण्या करता आले.ह्यावर संघटनेनी तातडीणे वसई विरार मनपाच्या आयुक्ताना कामगारांच्या वतीने निवेदन लिहले.निवेदनात मुख्य मागण्या मांडण्यात आल्या कामगारांना बेकायदेशीर पणे कामावरुन काढू नये.त्यांना पुन्हा कामावर घेउन कायम स्वरुपी काम द्या.असे आदिवासी एकजूट संघटनेचे च्यावतीने वसई विरार महानगर पालीकेला २६जून रोजी देण्यात आले आहे संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष कु. शेरू वाघ सदस्य श्री. आकाश लढे व इतर संघटनेचे पदाधीकारी तसेच सर्व सफाई कामगारांनी आयुक्ताना २६जून रोजी निदेन दिले आहेत.संघटनेनी निवेदना मार्फत आयुक्ताना ईशारा दिला आहे.जर ७दिवसात कामगारांना कामावर घेतले नाही.तर लाँकडाउन च्या काळात स्वताच्या जिवाचा पर्वा न करता ज्यांनी संपुर्ण वसई विरार ची घाण साफ केली त्यांच्या साठी फक्त आम्हीच नाही तर संपुर्ण देश भरात टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या तीच जनता सोबत घेउन रस्त्यावर उतरुन आंदोलन करू आणी सर्व कामगारांना न्याय देवु असे आदिवासी एकजूट संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला.