

उत्पन्नाचे साधन गमावलेल्या व COVID-19 च्या आपत्तीत होणार्या अडचणींना तोंड देत असलेल्या स्थलांतरित व्यथित कामगारांना वसईतून केरळ येथे त्यांच्या मूळ घरी पाठविण्यात आले. माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व वसई तालुका मल्याळी वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्री. जो. जो. जेकब व कार्यकर्ते यांनी आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून मदत केली. एआयसीसी अध्यक्षा श्रीमती. सोनिया गांधी, राहुलजी आणि श्री. के. सी. वेणुगोपाल यांच्या सूचनेनुसार अॅड. मॅथ्यू अँथनी आणि लेखा नायर सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश प्रोफेशनल काँग्रेस (आय्) समिती व अॅड. रिव्या सिंह आणि मित्रांनी मोफत प्रवास करण्यासाठी बसेसचे प्रयोजन केले . त्यामुळे आम्ही प्रत्येक स्थलांतरिताला विनाशुल्क पाठविण्याच्या आमच्या मोहिमेमध्ये यशस्वी होऊ शकलो. वसई ख्रिश्चन असोसिएशनने, वसई विभागात लॉकडाऊन चालू असतानाही 2365 कुटुंबांना त्यांच्या मासिक तरतुदींसह औषधांच्या वाटपाची मदत केली आणि ह्याकामी आशिर्वाद प्रार्थना केंद्राच्या सि. आशा मार्टिन, हार्मोनी फाउंडेशन तसेच काही इतर वैयक्तिक दानकर्ता ह्यांचे सहकार्य लाभले. तसेच, कोकण विभागाचे आय.जी. श्री. निकेत कौशिक आणि डि.वाय.एस.पी. डॉ. अश्विनि पाटील यांनी आम्हाला व आमच्या सदस्यांना सर्व ई-पास आणि अन्य औपचारिकतेची मदत केली जेणेकरून आम्ही वैयक्तिकरित्या ह्या गरजू कुटुंबांना कोणतीही अडचण न येता मदत करू शकलो. फादर मॅथ्यू पॅरिश प्रिस्ट-अल्फोन्सो चर्च यांनी सदर बसेस स्टेला पेट्रोल पंप येथून जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला. संदीप शेट्टी, रेजी कुरियन, जोसेफ वर्गीस आणि इतर कार्यकर्त्यांनी गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली व त्यांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झाले आहे.