खाजगी रुग्णालये बंद असल्याने उपचारा अभावी लोकांचा मृत्यूचा आकडा वाढला

जागतिक महामारीच्या काळात उपचार नाकारणाऱ्या रुग्णालये व डॉकटर वर गुन्हे दाखल करावेत

वसई (प्रतिनिधी) वसई तालुक्यात कोविड आजारामुळे 22 मार्च पासून वसईतील बहुसंख्य डॉकटरानी आपले खाजगी दवाखाने बंद ठेवलेले आहेत. यातील बहुसंख्य डॉकटर हे कोणाच्या ना कोणाचे फेमली डॉकटर आहेत मात्र सध्या हे डॉकटर आपल्या नेहमीच्या रुग्णांना कोविड आजाराच्या भीतीमुळे रुग्ण तपासणी व औषध उपचारासाठी सपशेल नकार देत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना उपचार मिळत नाहीत आणि छोट्या छोट्या कारणास्तव माणसं मरू लागली आहेत, सध्या करोनामुळे माणसं कमी दगावत आहेत मात्र अन्य आजारावर योग्य उपचार , डॉकटर मिळत नसल्यामुळे मृत्यूचा आकडा वसईत वाढत आहे. डॉकटर आपले क्लिनिक , दवाखाने बंद ठेवत आहेत त्यामुळे कोविड व्यतिरिक्त सर्वसामान्य रुग्ण अन्य आजाराने मरू लागले आहेत पालिकेने तसेच आरोग्य विभागाने बंद असलेली रुग्णालये , क्लिनिक उघडण्यासाठी कठोर अमलबजावणी केली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते मात्र वसईत रुग्णांचे हाल कुत्रे खाईनात असे झाले आहे. कोविड रुग्णा व्यतिरिक्त उपचारा अभावी मृत्यू झालेले सर्व निष्पाप नागरिकांची ही शासनाने केलेली हत्याच आहे असा आरोप कोणी केलाच तर नवल वाटू नये. महामारीच्या काळात डॉकटरानी लोकांचे प्राण वाचविणे आवश्यक आहे मात्र गरज असतानाही आशा परिस्थितीत दवाखाने बंद करून घरात लपुन बसलेल्या डॉकटरांचे परवाने रद्द करावेत अशी।मागणी होऊ लागली आहे. पालिकेने देखील केवळ कोविड वर लक्ष केंद्रित करू नये अन्य आजाराने लोक मरत आहेत त्यावर उपाययोजना आखावी व लोकांचे प्राण वाचवावेत त्यांच्याही आरोग्यासाठी पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *