
आयुक्तांची भेट घेऊन घेतला सद्य परिस्थितीचा आढावा!

विरार (दि )प्रतिनिधी
वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातही कोरोनाचा पसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी आज वसई-विरार मनपा आयुक्त श्री गंगाधरजी यांची भेट घेऊन सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.
वसई विरार शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता रिकामी असलेल्या नवीन इमारती व काही बंद कंपन्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड हॉस्पिटल व विशेष विलगीकरण कक्ष उभारावा व सदर ठिकाणी आवश्यक तितके डॉक्टर्स व नर्सेस उपलब्ध करावे या विनंतीचे निवेदन आमदार फाटक यांनी यावेळी आयुक्तांना दिले.
तसेच कोविड सेंटर साठी माझ्या आमदार विकास निधीतून रु 25 लक्ष देण्याचे व आवश्यक तितका निधी व याविषयी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ,नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे व पालकमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आयुक्तांना यावेळी आश्वासित केले असल्याची माहिती श्री फाटक यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच महापालिकेच्या माध्यमातून विरार येथील चंदनसार भागात उभारण्यात येणाऱ्या विशेष कोविड हॉस्पिटलची पाहणी देखील आयुक्त गंगाधर यांच्या समवेत आमदार फाटक यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत उपजिल्हा प्रमुख श्री. निलेश तेंडुलकर, मनपा शिवसेना गटनेत्या सौ. किरण चेंदवणकर , नगरसेवक स्वप्नील बांदेकर ,नगरसेविका सौ शिल्पा सिंह,विरार शहरप्रमुख मनीष वैद्य, उपतालुकाप्रमुख अतुल पाटील, दिवाकर सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते .