

वसई(प्रतिनिधी):सध्या भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात ही कोरोना चां वाढता प्रादुर्भाव पाहता सगळीकडे लॉक डाऊन करण्यात आले होते अशा वेळी सामान्य नागरिकांची गैरसोय न होता उपासमार होऊ नये म्हणून शासना तर्फे अन्नधान्य चे वाटप करण्यात आले, त्या नुसार केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना माहे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे माणशी ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु माहे जून महिना संपला तरी तहसीलदार वसई यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक रेशन दुकानदारांकडून नागरिकांना मोफत धान्य मिळाले नसल्याचे निदर्शनास येते आहे, तरी वसई तालुक्यातील ज्या रेशन दुकानदारांनी माहे जून महिन्यांचे मोफत धान्य वितरण केले आहे त्या दुकानदारांची यादी देण्यात यावी व ज्या दुकानदारांनी माहे जून महिन्यांचे मोफत धान्य वितरण केले नाही त्या दुकानांचे परवाना क्रमांकासह, पूर्ण पत्त्यासह, त्यांच्याकडे नोंद असलेल्या शिधापत्रिकेच्या आकडेवारी सह देण्यात यावी अशी मागणी पुरवठा निरीक्षण अधिकारी, वसई यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते श्री तसनिफ नूर शेख यांनी केली आहे