वसई(प्रतिनिधी)-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वसई विरार महानगर पालिकेच्यावतीने वसई वालिव येथे १००० बेडचे कोविड स्पेशल हॉस्पिटलचे आज पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या हॉस्पिटल मध्ये १५० सेंट्रलाईझ ऑक्सिजन बेड्स चे कक्ष असून ४ ऍम्ब्युलन्स आणि ९ प्रभाग समितीच्या ९ मदत कक्षासाठी ९ वाहनांचे अनावरण देखील आज केले.यावेळी खासदार राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे ,आयुक्त गंगाथरन डी,पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोनाच्या महामारीशी लढण्यासाठी वसई विरारमध्ये प्रशासनाची पूर्ण तयारी असून वसई विरारच्या नागरिकांनी देखील प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पालकमंत्री भुसे यांनी केले.
कोरोना वायरसने सर्वत्र थैमान घातलेला असून त्यावर नियंत्रण मिळविणे कामी वसई विरार मनपा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सद्यस्थितीत मनपाचे वसई पश्चिमेकडील गोन्सालो गार्सिया व अग्रवाल येथे कोविड केअर सेंटर सुरू असून म्हाडा कॉलनी व विवा कॉलेज विरार येथे कॉरन्टाईन सेंटरर्स सुरू आहेत. परंतु दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या पाहता मनपाची आरोग्य विभाग यंत्रणा, कोविड केअर सेंटर्स व कॉरन्टाईन सेंटर्सवर अतिरिक्त ताण पडत आहे.या पार्श्वभूमीवर
वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट, गोलानी नाका, वालीव, वसई पुर्वे येथे १००० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
यामध्ये ६५० बेड तळमजल्यावर व ३५० बेड पहिल्या मजल्यावर अशी व्यवस्था असून १५० बेडकरीता पाईप ऑक्सीजनची व्यवस्था आहे. प्रत्येक माळ्यावर सुसज्ज टॉयलेट बाथरूम व्यवस्था आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *