हे विश्व एका अज्ञात शक्तीचा सुक्ष्मातिसुक्ष्म भाग आहे.अणु मधील एखाद्या सुक्ष्मातिसुक्ष्म कणा ईतका.त्या अज्ञात शक्तीचे आपले विश्व हे प्रकट रुप आहे.ही अज्ञात शक्ती म्हणजे नेमके काय हे कोणीही सांगु शकत नाही.आपल्या विश्वात आपल्या प्रुथ्वीचे स्थान नगण्य आहे.नगण्य म्हणजे त्या सुक्ष्मातिसुक्ष्म कणाईतके नगण्य.आपल्या सुर्यासारख्याअगणित तार्यापासुन आपली एक आकाशगंगा बनली आहे.अशा अगणित आकाशगंगा आपल्या विश्वात आहेत.
अशा या नगण्य प्रुथ्वीवर सजीव स्रुस्टी आहे.प्रुथ्वीच्या आजुबाजुला ज्ञात जगात सजीव स्रुष्टी असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही.विश्व निर्जीव असल्याचा तो पुरावा मानता येईल.अशा या विश्वाला त्या अज्ञात शक्तीने वेळेचे बंधन घालुन दिले.या बंधनाने सारी सजीव निर्जीव स्रुष्टी बांधली गेली आहे.बंधनाच्या पलीकडे कुणी जाऊ शकत नाही.सजीवाला मोहमायेची बंधने दिली.स्वार्थ ह्या सर्वात मोठ्या दुर्गुणाचे बंधन घातले.या बंधनांची असीम ताकद आहे.या ताकदीमुळे अज्ञातशक्ती आहे हे आपल्याला समजुनही तीचे नक्की स्वरुप काय ते कळत नाही.आपण मात्र आमचा देव ,आमचा धर्म ,आमचा देश,आमची भाषा,आमचा प्रांत,आमची माणसे,आमचा गाव आणि शेवटी आम्ही असे करत करत ईतरांचा द्वेष करत राहतो.त्या अज्ञात शक्तीची याबाबत भुमिका काय असावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *