

मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली त्यामुळे कित्येक नागरिकांचा नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बुडाले, वर्क फॉर्म होम मधून पगार कपात झाली ,रोजगार बुडाले. एकीकडे कोरोनाचे भय तर दुसरीकडे आर्थिक चणचण अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक असताना महावितरण यांनी सरासरी भरमसाठ बील पाठवून जो झटका दिला आहे त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
एकंदरीत बिल नागरिकांना देत असताना सरासरीच्या नावाखाली जी आर्थिक पिळवणूक महावितरण यांनी केली आहे त्याची पोलखोल संक्षिप्तपणे खाली नमूद करीत आहोत.
१) मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी जाहीर करण्यात आली त्यामुळे फेब्रुवारीचे बिल जे मार्च महिन्यात येत होते ते रिडींग न घेतल्याने आले नाही.
जूनअखेर पर्यंत अनलॉक होईपर्यंत रिडींग घेतले नाही.
२) फेब्रुवारी ते मे पर्यंत आपण सरासरी बिल दिले ते सरासरी बिल महावितरण कडून ज्या महिन्यात वीज कमी वापरली जाते ते महिने म्हणजे नोव्हेंबर २०१९ / डिसेंबर २०१९/ जानेवारी २०२० या ( हिवाळा) तीन महिन्यांची सरासरी नोंद केली गेली आणि ती सरासरी फेब्रुवारी २०२० ते मे २०२० या म्हणजे जास्त वीज वापरली जाते ( उन्हाळा) चार महिन्यात नोंद केली.
३) उदाहरणार्थ
नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० मध्ये या तीन महिन्याचे एकंदरीत वीज युनिट पकडून सरासरी ५० युनिट प्रति महिना असे काढलेले युनिट महावितरण यांनी फेब्रुवारी २०२० ते मे २०२० या चार महिन्यासाठी २०० युनिट ( प्रत्येक महिना ५० युनिट )आकारले गेले.
अनलॉक जाहीर झाल्यानंतर जेव्हा मीटर रिडींग घेतले गेले त्यावेळी फेब्रुवारी ते जून अखेरीस म्हणजे ५ महिन्याचे एकूण वापर ६०० युनिट असतील तर सरासरी ४ महिन्याचे २०० युनिट वजा केले गेले आणि उर्वरित ४०० युनिट वापर जून महिन्याचा वीज वापर दाखवण्यात आला जो पूर्णपणे चुकीचा आहे.
४ )नोव्हेंबर आणि जानेवारी महिने हिवाळा असल्याने घरातील पंखे / वातानुकूलित यंत्र बंद असतात अशा वेळी वीज कमी वापरली जाते आणि फेब्रुवारी ते मे महिन्यात उन्हाळा असल्याने वीज जास्त वापरले जाते परंतु या वस्तुस्थितीकडे महावितरण यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे.
जर महावितरण यांना योग्य वीज सरासरी आकारणी करायची होती तर
मागील फेब्रुवारी २०१९ ते मे २०१९ या चार महिन्याची सरासरी काढावी किंवा वर्षभरातीळ १२ महिने पकडून प्रत्येक महिन्याची सरासरी काढणे इष्ट होते.
५ ) जून २०२० या महिन्याचे जे वीज देयक आहे ते महावितरण यांच्या चुकीच्या धोरणामुळे जास्त दाखवले गेले आहे जो ग्राहक
फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात एकूण २०० युनिट वापरतो तो थेट जून महिन्यात ४०० युनिट कसे वापरेल हे सामान्य माणसाच्या नव्हे तर गणिततज्ञ असणारया महानुभावच्या समजण्याच्या पलीकडचे आहे.
६) जून महिना अखेर घेतलेले युनिट मार्च ते जून या चार महिन्यात समान विभागून द्या.
वरील निवेदन आज विभागीय कार्यालय ,महावितरण ,वसई पश्चिम येथे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण , उपविभागप्रमुख प्रसाद वर्तक, शाखाप्रमुख यांनी चड्डी बनियान घालून महावितरण यांनी उरले सुरले कपडेही अंगावरून उतरवू नये म्हणून निवेदन दिले.