

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वसई-विरार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढत असून आता पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे जिथे जिथे पावसाच्या पाण्याने रस्ता तुंबला जातो तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाले व गटारे यांचे साफसफाई किंवा डागडुगी करण्यास महापालिकेला आता जाग येत आहे परंतु या केलेल्या कामाचा नागरिकांना कितपत फायदा होईल व त्यांची गैरसोय होणार नाही याची कोणतीही पर्वा न करता केवळ आपला व आपल्या सहकाऱ्यांचा फायदा कसा होईल हेच फक्त महानगरपालिका प्रभाग समिती आय चे सहायक आयुक्त श्री सुभाष जाधव व बांधकाम विभागाचे श्री प्रकाश साटम हे पाहत आहेत. याचाच प्रत्यय बाभोळा सांडोर येथे नवीन नवीन उघाडीच्या जवळ काही दिवसांपूर्वी बनवलेला रस्ता खचण्यात आलेला दिसून आला आहे. हा रस्ता प्रभाग समिती आय चे सहायक आयुक्त श्री सुभाष जाधव व बांधकाम विभागाचे श्री प्रकाश साटम व अभियंता यांच्या देखरेखीखाली ठेकेदाराने बांधला आहे. ज्यात निकृष्ट दर्जाचा माल वापरून आपले खिसे भरण्याचे काम यांनी केले आहे. तसेच अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला महानगरपालिका मंजुरी कसे देते..?? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ही अत्यंत निंदनीय व अशोभनीय बाब असून जनतेचा पैसा लुटण्याचा प्रकार आहे. तसेच इथे काही वेळा अपघात होताना बचावला आहे पण जर अपघात झालाच तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे महानगरपालिका प्रभाग समिती आय चे सहायक आयुक्त बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, अभियंता व त्यांच्या मर्जी चे ठेकेदार असतील. तसेच या रस्त्यालगत असलेला नैसर्गिक नाळा आहे ज्यामुळे पावसाच्या पाण्याचे वाहून निचरा होण्यास मदत होईल त्या नाळ्यावर कल्वर्टर बांधण्याचे काम केले गेले. परंतु त्या नाळ्या लगत असलेल्या तांदूळ बाजार मालकाने त्या नाळ्यात अनधिकृत भिंत बांधावयास घेतली असून ती कोणाच्या मर्जीने व परवानगी ने बांधण्यात येत आहे..?? जर ही भिंत अधिकृत असेल तर बांधकाम विभागाचे श्री प्रकाश साटम त्याची परवानगी चे कागदपत्र का सादर करीत नाही..?? ह्यावर आयुक्त श्री गंगाधर डी. यांचे लक्ष आहे का..?? अशा मुजोर अधिकारी व ठेकेदार यांच्या वर आयुक्त कारवाई करतील का..?? असा सवाल नागरिकांच्या मनात येत आहे. यावरून फक्त इतकेच दिसून येते की महानगरपालिका प्रभाग समिती आय यांना जनतेच्या जीवाची व कष्टाने कमवलेल्या पैशाची अजिबात किंमत नसून केवळ आपले आर्थिक पोट भरण्यात मग्न आहेत. त्यामुळे झालेल्या प्रकाराचा जाब त्यांना संतापलेल्या नागरिकांना द्यावाच लागेल..