वसई (प्रतिनिधी) : वसई विरार महापालिकेची स्थापना झाल्यानंतर म.न.पा.के वर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यात तथ्य हि होतेच काही प्रकरणात चौकशी चालू असल्याचे बोलले जात आहे अशाच प्रकारचा महापालिका क्षेत्रात झालेला टि.डी.आर.घोटाळयाचा भ्रष्टाचार आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास हरी पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघडकीस आणला आहे त्या बाबत समजलेली माहिती अशी की गाव मौजे सोपारा येथील सर्वे क्र.. ३२ /अ, हिस्सा नं.१/अ १/ब हि जमीन ज्याचे क्षेत्रफळ २०२३० चौ.मी.असे आहे त्यातील १७२३८ चौ.मी.जमीन नवीन अवीभाज्य शर्तीची असून महापालिके च्या मंजूर विकास आराखड्या प्रमाणे खेळायचे मैदान व रस्ता ह्या साठी आरक्षीत ठेवली होती २०१६ साली महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना सदरची आरक्षीत जमीन विक्रीने हस्तांतरास परवानगी देण्या बाबत आदेश पारीत केले होते त्या प्रमाणे जिल्हाधिकारी पालघर यांनी अटी व शर्तीचे पालन करुन आदेश दिले होते त्या नुसार अट व शर्ती क्र.५ मध्ये जमीनधारक खरेदीदार यांनी सदरच्या जमीनीचा खरेदी, विक्री, हस्तांतरण,हे व्यावहार आदेशाच्या दिनांकापासून ६ महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असेल असे नमूद केले होते मात्र सदरच्या जागेचे कुळ मुखत्यार असलेले हेमंत अनंत पाटील यांनी त्या अटी व शर्तीचा भंग केल्याने ७ सप्टेंबर २०१६ रोजी सदरच्या जागेची परवानगी रद्दबातल झाली होती जमीन मालक चिंतामण नारायण किणी व त्यांच्या कुटुंबीयांचे कुळ मुखत्यार असलेले हेमंत अनंत पाटील यांनी पालघर जिल्हाधिकारींनी दि. ७ सप्टेंबर २०१६ रोजी रद्दबातल केलेली परवानगी चे दस्त क्र.५९२१/२०१६ सह दुय्यम निबंधक वसई ५ दिनांक १८/११/१६ रोजीच्या दस्ता मध्ये जोडून महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे तसेच दस्त क्र.१०८४८/२०१७ रोजी सह दुय्यम निबंधक वसई २ दिनांक १९/१२/१७ रोजी हेमंत अनंत पाटील यांनी संबंधित दस्ता मध्ये पालघर जिल्हाधिकारी यांचे आदेश न जोडता सदरची आरक्षीत जमीन महापालिकेकडे हस्तांतरित केली.शासनाचा महसूल बुडवून आपले उखळ पांढरे करणाऱ्या हेमंत अनंत पाटील यांनी केलेल्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याचे बिंग अखेर फुटले सह जिल्हा निबंधक वर्ग १ठाणे यांनी दिलेल्या पत्रावरुन आरक्षीत क्षेत्रासाठी ८०१५ रुपये प्रती चौ.मी.प्रमाणे मुल्यांकन केले होते मात्र १जाने.१५ ते ३१ मार्च १६ ह्या आर्थिक वर्षात सदरच्या जागेचा शासनाच्या दर तक्त्या प्रमाणे १४४०० रुपये प्रती चौ.मी मुल्यांकन केले गेले होते मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरक्षीत जागेची ६३८५ रुपये प्रती चौ.मी मुल्यांकन कमी दाखवल्याने शासनाचा ३,६६,८४,९६६ तीन करोड सहासष्ट लाख चौऱ्याएंशी हजार नवशे सहासष्ट रुपयांचा महसूल बुडाला आहे दस्त क्र ७४५८/१७ वसई २ येथे सुध्दा सदरच्या जागेची नोंदणी करताना १५४०० रुपये प्रती चौ.मी मुल्यांकन होते मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ८३४८.६३ रूपये प्रती चौ.मी प्रमाणे मुद्रांक शुल्क आकारणी केली असल्याने शासनाचे ७०५१ रुपये प्रती चौ.मी प्रमाणे ७२,९२,७९२.८९ बहात्तर लाख बॅनव हजार सातशे बॅनव रुपये एकोणनवद रूपये नुकसान झालेले आहे जमीन मालक व हेमंत पाटील यांचे कुळ मुखत्यार सुध्दा ५०० रूपये मुद्रांक शुल्क भरुन वसई ४ येथे दस्त क्र ५९८५/२०१६ व वसई २ येथे दस्त क्र ७४५९ नोंदणीकृत केलेले असून नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेले नाही एवढे करूनही न थांबता हेमंत पाटील याने त्याच कुळ मुखत्याऱ्याने परत सदरची जमीन दस्त क्र ५९२१/२०१६ वसई ५ ,व १०८४८/२०१७ वसई २ अन्वये महापालिकेकडे हस्तांतरित केल्यामुळे शासनाचे १,५९,२७,९१२ एक करोड एकोणसाठ लाख सत्तावीस हजार नवशे बारा रुपयांचा महसूल बुडविला गेला आहे हेमंत पाटील यांनी महापालिका, महसूल विभाग,व मुद्रांक शुल्क च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेल्या टि.डी.आर घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत जागेचे विकास हस्तांतरण रद्दबातल करण्यात यावे व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२० व नोंदणी अधिनियम कलम ८२ व ८३ नुसार हेमंत पाटील वर गुन्हे दाखल करुन त्यांच्या अटकेची मागणी आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास हरी पाटील यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *