पालघर प्रतिनिधी :- दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून विविध कल्याणकारी योजना व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.दिव्यांगांचे पुनर्वसन व्हावे हाच मानस केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा आहे आणि यासाठीच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या एकुण स्वऊत्पनातुन पहिले ३ टक्के निधी आणि आता सुधारीत वाढिव ५ टक्के निधी हे दिव्यांगांवर खर्च करने बंधनकारक केले आहे तसेच हा निधी पुर्णतः त्याच त्या वर्षी खर्च करणे सुद्धा बंधनकारक आहे परंतु हा निधी पुर्णतः खर्च झाला आहे कि नाही यासाठी अपंग जन शक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास केंगार यांनी संपुर्ण पालघर जिल्हा पुंजुन काढला परंतु प्रत्यक्ष दिव्यांग भेटित आपल्याला हा हक्काचा निधी भेटला नसल्याचे जिल्हाभरातील दिव्यांगांनी देविदास केंगार यांना सांगितले.देविदास केंगार हे स्वत: या निधी खर्चाबाबतच्या संनियंत्रण समितीचे सदस्य असल्यामुळे केंगार यांना हि बाब खटकली आणि संपुर्ण पालघर जिल्ह्यातील पंचायत समित्या.सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांच्या कडील सन २०१७ ते आजवरच्या दिव्यांग निधी खर्चाची माहिती देविदास केंगार यांनी मागीतली असता या माहितीत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली ती म्हणजे जिल्हा परिषद पालघर कडुन दिव्यांगांसाठी सन २०१७-१८ मध्ये एकूण ११५००००० रूपयांची तरतूद करण्यात आली होती त्यामधुन ६९०८०४९ रूपये खर्च करण्यात आले होते तसेच शिल्लक ४५ लाख ९१ हजार ९५१ रूपये ईतकि होती याप्रमाणेच २०१८-१९ मध्ये ३६०७७८४८ रूपयांची तरतुद होती खर्च २२८४११६७ झाला आणि शिल्लक १ कोटी ३२ लाख ३६ हजार ६८१ आणि २०१९-२० मध्ये ११९७००० तरतूद केली खर्च ६०००५७ शिल्लक ५ लाख ९६ हजार ९४३ रूपये अशा प्रकारे जिल्हा परिषद पालघरने दिव्यांगांच्या शिल्लक निधीवर १ कोटी ८४ लाख २५ हजार ५७५ रूपयांवर डल्ला मारला असाच काहीसा प्रकार पंचायत समिती स्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर हि घडले असल्याचे देविदास केंगार यांनी सांगत पंचायत समिती स्तरावर २०१७-१८ मध्ये ३९२१६९८ तरतूद करण्यात आली होती त्यामधुन २२५६६८२ रुपये खर्च करण्यात आले शिल्लक १६ लाख ६५ हजार १६ रूपये. २०१८-१९ मध्ये ४२०३९१७ तरतुद केली खर्च ३४१३३६६ तर शिल्लक ७ लाख ९० हजार ५५१ रूपये. २०१९-२० मध्ये ८८७१००० तरतूद केली खर्च ८७४३००० केला तर शिल्लक १ लाख २८ हजार रुपये याप्रमाणे आजवर २५ लाख ८३ हजार ५६७ रूपयांवर डल्ला मारला तर पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर सन २०१७-१८ मध्ये ९०४८८९२ ची तरतूद केली खर्च ८५१९००० केला तर शिल्लक ५ लाख २९ हजार ८९२ रूपये. सन २०१८-१९ मध्ये तरतुद १८६४६९९९ केली तर खर्च १८५७०२१५ केला तर शिल्लक ७६ हजार ७८४ रूपये.सन २०१९-२० मध्ये १७६४१००० तरतुद केली खर्च १७१७७००० आणि शिल्लक ४ लाख ६४ हजार रुपये.अशा प्रकारे ग्रामपंचायत स्तरावर १० लाख ७० हजार ६७६ रूपयांवर डल्ला मारला असल्याचे देविदास केंगार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे तसेच हा निधी पुर्णतः खर्च करून घेतल्या शिवाय अपंग जन शक्ती संस्था शांत बसणार नाही असे केंगार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *