वसई,दि.16(प्रतिनिधी) :- नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने राज्यभरातील गरजू माध्यमकर्मींना सरकारने सर्वोतोपरी सहकार्य करणेचे निवेदन दिले होते.
राज्यभरात धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, खासदार, पालकमंत्री आदी मान्यवर व शासनाचे वतीने देणेत आलेल्या जीवनावश्यक वस्तू गरजुंपर्यत पोहोचवण्याचे काम एनयुजे महाराष्ट्र चे पदाधिकारी करताहेत, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमकर्मींना व गरजू व्यक्तीना मदत करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे सहकार्याने घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे संच(कीट)चे वाटप एनयुजे महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे वतीने
करण्यात आले आहे.
या कामी एन.यु.जे.एम.च्या अध्यक्षा सौ. शीतलताई करदेकर यांचे निर्देशानुसार मदतीने हे काम केले गेले.
पालघर
जिल्ह्यातील या खडतर परिस्थितीतही पत्रकारिता करणाऱ्या माध्यमकर्मींसाठी मदतीचा हात देण्याच्या
हा प्रयत्नाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
याकामी पालघरचे उपजिल्हाधिकारी किरण महाजन, तहसीलदार उज्वला भगत तसेच एन.यु.जे.एम.च्या कोषाध्यक्षा वैशाली अहेर, संघटक सचिव कैलास उदमले, यांचे मार्गदर्शन लाभले आणि पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई, सचिव अनिल
पाटील यांनी मेहनत घेतली.
हे मदत कीट आणण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे वॉर्ड क्र.18 चे अध्यक्ष जहीर
शेख यांनी टेंपो उपलब्ध करुन दिला. संघटनेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.
वसई-विरार महानगर पत्रकार संघाच्या काही पत्रकारांना देखील या जीवनावश्यक कीटची सहायता करण्यातआली .
तसेच पत्रकार युसूफ अली बोहरा, श्रीकांत सुद्रीक यांनी सहकार्य केले. उपाध्यक्ष उमाकांत वाघ, खजिनदार रविंद्र घरत,गणेश कानडे
यांनी वरील सर्व मदत उपक्रम राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
युनियनचे वतीने राज्याचे सर्व पदाधिकारी व एनयुजे इंडिया चे वरिष्ठ नेते व एनयुजे महाराष्ट्र चे मार्गदर्शक शिवेंद्रकुमारजी यांनी पालघर जिल्ह्या जिल्हाधिकारी कैलास शिंदे व सहकारींचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *