मुंबई : उत्तर मुंबई रिपाइं (आठवले गट) च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृतिदिनी त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरी चळवळीला दिलेले योगदान व आपल्या साहित्याद्वारे केलेल्या प्रबोधनाच्या महान कार्याला या वेळी अनेक मान्यवरांनी उजाळा दिला. रिपाइं उत्तर मुंबईच्या बोरिवली येथील कार्यालयात अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली. रिपाइं नेते प्रकाशजी बनसोडे साहेब यांनी या वेळी उपस्थितांना संबोधित करताना सद्यस्थितीत आण्णा भाऊ यांच्या साहित्याचा अभ्यास करून दलितांच्या प्रगतीसाठी तरुणांनी वाटचाल करायला हवी , असे प्रतिपदन केले. या वेळी बहुनज विद्यार्थी नेते अॅड . संदीप केदारे, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी नेते सुरेश टिके , बोरिवली तालुका महिला अध्यक्ष लक्ष्मी चव्हाण , उत्तर मुंबई जिल्हा महिला उपाध्यक्ष हिना भतीजा , बोरिवली तालुका उपाध्यक्ष धनंजय जैस्वार आणि बोरिवली तालुका खजिनदार तुकाराम कांबळे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *