

वसई /वार्ताहर : वाढीव बांधकामावर महापालिकेने कोणतीच कारवाई न केल्यामुळे नाळ्यातील टेस्टी हॉटेलने गटारावर बांधकाम करण्याचा पराक्रम केला आहे.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राऊत
यांनी केली आहे.नाळे येथील प्रभाग क्रमांक ३५ मधील हॉटेल टेस्टी रेस्टॉरंट आणि बारने दुरुस्तीच्या नावाखाली अनाधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात केले आहे.या बांधकामाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे निर्ढावलेल्या हॉटेल चालकाने गटारावर अनधिकृत बांधकाम केले आहे.त्यामुळे सदर बांधकाम निष्कासित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राऊत यांनी महापालिकेकडे केली आहे.