
◆ जवळपास 36000 कुटंबापर्यत औषध पोचवण्यात यश
● आशा सेविकांना सँनिटायझर तसेच ईतरआवश्यक साहित्याचे कीट वाटप!
भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था व हाउसिंग सोसायटी पदाधिकारी यांच्या माध्यमातून विरार, नालासोपारा तसेच पश्चिम पट्ट्यामधे आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या आरसेनीक अल्बम 30 या गोळ्या जवळपास 36000 ( छत्तीस हजार) हुन अधिक कुटुंबात विनामूल्य पोहचवले असुन दुसऱ्या टप्प्यामधे अजुन 24000 (चोवीस हजार) कुटुंबात आरसेनीक औषध पोहचवणार असल्यानची माहिती मनोज पाटील यांनी दिली. यासोबतच घरोघरी तपासणी करुन आरोग्य यंत्रणेला मदत करणाऱ्या आशा सेविकांना सँनिटायझर, मास्क, ग्लोज, विटँमीन सि व आरसेनीक तसेच फेसशील्ड असलेले किट देण्यात आले. अनेक दिवस लोकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुध्दा हे कीट देण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सोसायटी पदाधिकारी, सामाजिक संस्था पदाधिकारी याचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने जास्तीत जास्त कुंटुबापर्यंत पोहोचणे शक्य होत असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. या अगोदर सुध्दा औषध फवारणी, माफक दरात भाजीपाला, गरजुंना धान्य वाटप चे काम करत असुन जास्तीत जास्त कुटुंबात आरसेनीक अल्बम औषध पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले.