वसई (प्रतिनिधी) – वसई विरार महानगरपालिका चे आयुक्त गंगाथरन डी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वरुण इंडस्ट्रीज मधील विलगीकरण कक्षात रुग्णां”मार्फत” सरकारी मालमत्तेच होणाऱ्या नुकसानी बाबत वक्तव्य केले होते व त्याही पुढे जाऊन असेही म्हटले माणुसकीच्या नात्याने वगैरे आम्ही कारवाई केली नाही. आयुक्तांनी सदर प्रकरणात आरोपी समाजकंटकांना पाठीशी न घालता वसई विरारकर जनते समोर आणावे अशी विनंती वजा मागणी सर्वस्तरातून होत आहे.

विलगीकरण कक्षात दाखल झालेला व्यक्ती रुग्ण वेगवेगळ्या मानसिकतेतून जात असतो. कोरोना’ची भीती, रुग्णालयांची वाढती बिले, समाजाच्या रुग्णांविषयक बदलणारा दृष्टीकोन, कोविड अहवालाची सध्याची परिस्थिती या सर्व गोष्टींमधून हा रुग्ण जात असतो अशातच विलगीकरण केंद्रातील मिळणाऱ्या सुविधांबद्दल तो कमी जास्त प्रमाणात नाराज समाधानी असतो. अशावेळी रुग्ण असे कृत्य स्वत:हून करेल अशी शाश्वती देता येत नाही. नक्कीच आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या सरकारी मालमत्तेच नुकसान रुग्णांमार्फत करवले गेले आहे. आयुक्तांनी अशा समाजकंटकांना पाठीशी न घालता या वसई विरारकर जनते समोर आणावे व या मागचा खऱ्या सुत्रधाराचे पितळ उघडे पाडावे व नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी वसई विरारकर जनता करत आहे. या वसई-विरार कर जनतेला उच्च शिक्षित आयुक्त लाभले असून आयुक्तांनी त्याच्या पदास साजेसे काम करून वसई विरारकरांची हृदय जिंकावी असे मत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केले.

सध्या कोविड केअर सेंटर मधील वाढत चाललेले गैरप्रकार रोखण्यासाठी वविमनपाने विशेष प्रयोजन सीसीटीव्ही यंत्रणा/सुरक्षारक्षक यांची तरतूद करावी असे विक्रांत चौधरी यांनी मत मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *