
प्रतिनिधी : (हर्षद गिरधोले) : दि.९ जून २०१९ रोजी शिवराजाभिषेक दिन व महाराणा प्रताप जयंती तसेच आद्य क्रांतीकारक बिरसामुंडा पुण्यतिथीच्या निमीत्ताने वसई तालुक्यातील सकवार गावाच्या एक अतिदुर्गम टाक्याचापाडा येथे ग्रामस्थांना व विद्यार्थिंना कपडे,मिष्ठांन्न,शैक्षणीक साहीत्य वाटप करुन ह्या दिनी महापुरषांना वंदन केले.टाक्याचापाडा येथिल गावकरींसोबत संवाद साधतांना त्यांनी अनेक अडचणींचा पाढाच वाचला यात शासनाकडुन मुलभुत गरजांची पुर्तता व्हावी ही माफक अपेक्षा करतांना मुख्यता पिण्यासाठी शुध्द पाणी,विज,रस्ता,आरोग्य सेवा मिळावी असे मत मांडले.हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी दिपस्तंभ प्रतिष्ठान या संस्थेचे सिध्दार्थ बाविस्कर,निलेश दळवी,सुशिल गोवारी,कविता दळवी,बारकु काटेला,वंदना बाविस्कर,अशोक राऊत,महेश बोलके,सौ.बोलके,कृतीका जाधव,राजु जाधव व संस्थेचे छोटी मंडळी तसेच सकवार गावातील समाजसेवक बबन बरफ व त्यांचे कुटूंब यांचे सहकार्य लाभले.अशा कार्यक्रमांसाठी मदतीचे आवाहनास प्रतिसाद देनारे श्रीम.मृणालीनी वानखेडे व त्यांचे सहकारी,एरोली यांचे कडुन मोलाची मदत मिळाली.दिपस्तंभ प्रतिष्ठान ही संस्था ही निमित्तमात्र आहे अशा कार्यक्रमांसाठी,आंम्ही समाजाचे देणे लागतो ह्याची प्रामाणीक जाणीव संस्थेचे सर्व सदस्य व हीतचिंतक यांना असल्यामुळेच असे कार्यक्रम करण्यास उत्साह असतो.

