

वसई : भाजपा वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांची वसई-विरार जिल्ह्याच्या महासचिव पदी वर्णी लागली आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष राजन नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन हा छोटे खाणी कार्यक्रम पार पडला.
उत्तम कुमार हे 1987 रोजी वसईत आले. लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक लहानपणीही संघाच्या बालप्रमुख कार्यवाह पदावर त्यांनी काम केले. त्यानंतर भाजपा वसई रोड मंडळाच्या सचिव, महासचिव व त्यानंतर तब्बल दोन वेळा वसई रोड मंडळाचे अध्यक्ष (6 वर्षे) म्हणून त्यांनी जबाबदारी पहिली तसेच बी. के. एस. शाळेच्या उपाध्यक्ष पदी त्याने काम सांभाळले. वसईच्या आयप्पा मंदिर ट्रस्टच्या कमिटीवर ही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.
उत्तम कुमार यांनी अध्यक्ष काळात मोठ्याप्रमाणात कामाचा सपाटा लावला होता. त्यांच्या कामाचे उदाहरण म्हणजे 6 वर्षात त्यांनी आपल्या कामाचे 4 कार्यअहवाल प्रकाशित केले. निवडणूक काळात त्यांनी अनेक मोठमोठ्या नेत्यांचा जणूकाही सपाटाच लावला होता. बविआचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या वसईत पहिला सुरुंग उत्तम कुमार यांनी लावला होता. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, लोकसभेच्या पोटनिवडणूकीत वसई रोड मंडळातील 90 पेक्षा अधिक बुथवर भाजपाला लीड मिळाला होता.
यावेळी उत्तम कुमार यांनी महाराष्ट्राचे महासचिव आ. रवींद्र चव्हाण व जिल्ह्याचे अध्यक्ष राजन नाईक यांचे व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचे खास करून आभार मानले.