देवरुख न्यायालयात दावा दाखल!

जिल्हा सरचिटणीस श्री अरविंद बेर्डे

वसई (प्रतिनिधी) – वसई व्हॉट्सॲप ग्रुपवरून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून चारित्र्यहनन करण्याचे प्रकार दिवसागणिक वाटत चालले आहेत. सरकारचे इशारा देऊनही हे प्रकार चालू आहेत. असाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस अरविंद बेर्डे यांचे बाबतीत घडला आहे. श्री अरविंद बेर्डे करोना लॉकडाऊन मध्ये त्यांच्या साखरपा गावी देवरूख – रत्‍नागिरी येथे गेले दोन महिन्याच्या काळात कुटुंबीयांसोबत वास्तव्यात आहेत. हया वेळी ‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान’ नावाच्या व्हाट्सॲप ग्रुप वर नालासोपारा विरार येथे रहाणारे चंद्रकांत कदम, हरीश कोटकर, अमित धुरी व योगेश बिर्जे यांनी संगनमताने जाणिवपुर्वक बदनामी करून चारित्र्य हनन करते वेळी जिल्हा सरचिटणीस मीडिया प्रमुख अरविंद बेर्डे वसई विरार शहर मधून फरार त्यांचेवर लाखो रुपयांची खंडणी मागणी केल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकांनी फौजदारी गुन्हा दाखल केला असा मजकूर प्रसिद्ध केला आहे सदर बाबतीत श्री अरविंद बेर्डे यांनी देवरुख पोलिस ठाणे येथे तक्रार दिली असता कलम ५००,५०१ व ३४ अन्वये गुन्हा नोंद झाला असून मा फौजदारी न्यायालय देवरुख येथे खटला दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *