

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत एस. सी. कास्टमधील विद्यार्थ्यांना ज्यांना शासकिय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मेस, व राहणे भाडे यासाठी या योजनेअंतर्गत दरवर्षी ६०,००० रु. मदत केली जाते. पण अजुनही या योजनेची अंमलबजावणी पुर्णपणे व सर्वसमावेशक झाली नाही. काही विद्यार्थी या वर्षीची (सन २०१८-१९) रक्कम मिळावी म्हणून सारख्या चकरा मारत होते. त्यांना तरतुद नाही, पैसे नाही, फंड नाही अशी उडवा- उडवी ची उत्तर दिली जात. पण आज दि. १०/०६/२०१९ या दिवशी विद्यार्थी कंटाळून अॉफीससमोरून उठलेच नाही. लेखी उत्तर द्या. अशी मागणी त्यांनी केली. प्रत्यक्ष चौकशी केली असता तब्बल १ करोड़ रूपयापेक्षा जास्त रक्कम विभागाकडे धूळ खात पडली आहे. यावर विद्यार्थ्यांनी त्यांना जुलै च्या आत जर रक्कम विद्यार्थ्यांना नाही दिली तर तीव्र निदर्शने करण्यात येतील असा इशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परीषदेचे ( आ )पुणे शहर अध्यक्ष सुरज गायकवाडव यांच्या नेतृत्वाखाली असा इशारा देन्यात आला व या वेळी
सुनिल जाधव, अमोल तांबे, मिलींद मोहिते, मनोज निकाळजे व………….हजारो विद्यार्थी उपस्थित होते…