
पालघर(प्रतिनिधी)-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने मुलांना घरीच राहून अभ्यास करावा लागत आहे
मात्र हालाकीच्या परिस्थिती असलेल्या अनेक गरजू मुलांना लॉकडाऊन च्या काळात शैक्षणिक साहित्य,वह्या पुस्तके घेता येत नाही अशा परिस्थितीत मुलांच्या भविष्याचा विचार करून
कुठलेही मूळ शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना घरी राहून अभ्यासाचा सराव असणे आवश्यक आहे
त्यासाठी त्यांना लागणारी शैक्षणिक सामुग्री ही त्यांच्याकडे असायला हवीत
ह्या परिस्थितीचा विचार करून वैतरणा तलावपडा येथील सामाजिक कार्यकर्ते, चित्रकार, आर्ट दिग्दर्शक
श्री बाळा पाटील यांनी मदतीचा हात पुढे करत पालघर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन वह्या , पुस्तके वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतला आहे
आतापर्यंत सादारण १२० विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यात सदैव पुढाक घेणारे आमचे सदस्य श्री बाळा पाटील यांनी केलेल्या ह्या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ..