

नवघर-माणिकपुर ब्लॉक काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री-मुझफ्फर भाई हुसेन यांच्या उपस्थितीत पार पडली.
या कार्यक्रमात नवघर-माणिकपुर चे ब्लॉक अध्यक्ष श्री राजू गव्हाणकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधून भाषण केले ह्या भाषणात विशेष करोना काळात अन्नधान्य वाटप करणाऱ्यांचे महान कार्य करणारे नवघर-माणिकपुर चे काँग्रेस कार्यकर्ते श्री-विजू डिसूजा,इमरान, दिनेश कडूल कर,राधा अय्यर,यांचा सत्कार केला वसई विरार जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री-मुझफ्फर भाई हुसेन यांनी नवघर-माणिकपुर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रत्येक विभागातील जनतेच्या अडीअडचणीसोडवण्याचे कार्यात कुठे बाधा येत असेल तर महाराष्ट्र प्रदेश मध्ये पत्रव्यवहार करून त्या अडचणींवर मात करता येईल असे आश्वासन त्यांनी दिले.