

वसई विरार मधील वाढती कोविड रुग्णसंख्या व विलगीकरण कक्षातील गैरप्रकारांचा आढावा घेण्यासाठी आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी श्री जतीन वालकर व सचिन सावंत आज दि 21 जुलै रोजी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विलगीकरण कक्षाला सस्नेह भेट देण्यासाठी गेले व तेथील उपस्थित सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच त्यांना व रुग्णांना येणाऱ्या समस्या-सुविधा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
वसई विरार मधील विलगीकरण कक्षातील अहवाल
१) जी जी कॉलेज मधील विलगीकरण कक्ष
कर्मचारी संख्या, डॉ संख्या वाढण्याची गरज आहे.
6-8 डॉक्टर आहेत रोटेशन ड्युटी.
50+ वय असलेल्या रुग्णांची सीबीसी टेस्ट करून डिस्चार्ज केले जाते, त्या खालील वयोगटातील रुग्णांना विनाटेस्ट डिस्चार्ज केले जाते.
(रिपीट कोविड टेस्ट होत नसल्या कारणाने 50 वयोगटाखालील रुग्णांना नोकरीवर, कामधंद्यावर रुजू होण्यास अडचण येत आहे यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.)
जेवण नाश्ता सफाई होते व्यवस्थित.
_आज दि 21 जुलै 2020 रोजी 300 रुग्ण होते 200 जागा खाली होत्या._
२) कॉल सिटी विलगीकरण कम हॉस्पिटल
43 खाटांपैकी 23 खाटा ऑक्सिजन च्या आहेत. *10 खाटांचे आयसीयु प्रतीक्षेत आहे.
3 रुग्ण प्रतिक्षेत आहेत….
नर्स वगैरेंना म्हाडा कॉलनीत रहाण्याची सोय केली असून ये जा स्वखर्चाने करत आहेत. वविमनपाने नर्स च्या येण्या जाण्यासाठी स्वत:हून प्रबंध केला पाहीजे किंवा या नर्स स्टाफना जी जी महाविद्यालयात रहाण्याची व्यवस्था करावी जेणे करून त्यांचा प्रवासाचा वेळ व स्वखर्च वाचेल.
इथे असणाऱ्या “मावशी” काम करणाऱ्या बहूतेक स्त्रिया ५५+ वयोगटातील आहेत यांना पर्याय उपलब्ध करून द्यावा.
३) अगरवाल हॉस्पिटल
80 खाटांचे रुग्णालय, माहीती मिळू शकली नाही. डॉ धनंजय विश्वकर्मा आज पासून 2 दिवस रजेवर जाणार असून त्यांच्या जागी कोण याची माहिती मिळाली नाही.
स्वँब टेस्ट ला खूप रुग्ण वेटींग वर आहेत, चाचणी संख्या वाढवावी., दिवसाला 150-200 स्वँब घेतला जातो.
४) वरुण विलगीकरण कक्ष, वालीव
साधारणत: ५००+ रुग्ण आहेत व फक्त 10 डॉक्टर रोटेशन ड्युटी करत आहेत. कसरत करावी लागत आहे.
(शिवभोजन थाळी योजने अंतर्गत जेवण पुरवले तर ट्रस्ट वरच लोड कमी होईल अस मत आहे व शासनाच्या योजनेचा लाभ योग्य ठिकाणी पोहचल्याचे समाधान मिळेल.)
वरुण इंडस्ट्रीज मधील विलगीकरण कक्षात झालेल्या गैरप्रकारांबाबत आयुक्तांनी ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता स्वत: शहानिशा करून कारवाई करावी अशी मागणी करत आहोत.
कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म मधे पाहून अत्यानंद झाला, याबद्दल आयुक्तांचे कौतूक.!
कर्मचारी, नर्स, डॉक्टर यांना विमा संरक्षण, मोफत उपचाराची हमी दिली पाहिजे.
फिव्हर क्लिनिक किंवा ज्या डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहण केल्या आहेत त्यांना मानधन मिळाले पाहिजे. डॉक्टर संघटनांशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून आयुक्तांनी ह्या कोरोनामय संकटातून वसई-विरार जनतेला मुक्त करावे.
_सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी सूचना करत आहोत._