
आय एम बिल्डकॉन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता नॉन कोविड रुग्णालय!
प्रतिनिधी – कोरोना प्रादुर्भाव काळात कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना व खाटा उपलब्ध होत नसताना “आय एम हॉस्पिटल” यांनी कोविड रुग्णांना उपचार देण्यास सुरूवात केली. विशेषतः रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा वापर न करता रुग्णांवर उपचार करण्यात आले असून रुग्णांच्या सकारात्मक प्रतिसादच या कालावधीत आमच्या साठी उर्जा देण्याच काम करत होती असे रुग्णालयाच्या व्यवस्थापिका आएशा खान-मिरांडा यांनी मत व्यक्त केले.
कोविड रुग्णालय सुरू करताना बऱ्याचश्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे माहिती होते कर्मचाऱ्यांना रहाण्यापासून ते वाढीव मानधन, जेवण वगैरे सारख्या सोयी उपलब्ध करून व कोविड रुग्णांपासुन स्वत:ला सुरक्षित ठेवून या रुग्णांना उपचार देणे आवश्यक असताना हा डोलारा सांभाळणे अशातच रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण व गैरसमज दूर करणेही तितकेच गरजेचे होते. रुग्णालय व्यवस्थापनाने हि बाजू भक्कमपणे सांभाळून घेतली.
वसई विरार मध्ये सर्वप्रथम खाटांविषयीच्या उपलब्धी करीता माहिती वसई विरारकरांना रुग्णमित्रांतर्फे वेळोवेळी देण्यात येत असल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचणे शक्य होत गेले व आम्हालाही सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली असे मत ओमर खान (सिईओ- आय एम हॉस्पिटल वसई) यांनी व्यक्त केले.
लवकरच नवीन उपलब्धी नुसार नॉन कोविड रुग्णालय म्हणुन परत वसई विरारकरांच्या सेवेत रूजू होऊ, या कोरोना प्रादुर्भाव काळात आम्हाला सहकार्य केलेल्या प्रत्येक घटकाचे मी आभार व्यक्त करतो असे क्रिस्टन मिरांडा (सिएओ- आय एम हॉस्पिटल वसई) यांनी मत व्यक्त केले.