
आर्थिक आघाडीवर देशातील अनेक बँका व आर्थिक संस्था डबघाईला आलेल्या असताना वसईतील कल्पतरू पतपेढी आर्थिक विकासासोबत
सामाजिक बांधिलकी जपत आहे.
पतपेढी द्वारे आर्थिक वर्षात ४० कोटी व्यवहार करत १ कोटी पेक्षा जास्त ढोबळ व ७५ लाख निव्वळ नफा मिळविला. मागील २० वर्षांपासून १५% लाभांश आपल्या सभासदांना देत आहे.
आर्थिक आघाडीवर उत्तम कामगिरी बजावत असताना, कल्पतरू पतपेढी सामाजिक बांधिलकी जपत सभासदांना आजारपणात आर्थिक मदत, कला – क्रीडा – शिक्षण यांच्या प्रगतीसाठी आर्थिक मदत देत प्रोत्साहन देत आहे. शेतकरी, महिला, गरजू यांना बचत गटाच्या माध्यमातून व सामाजिक योजनेतून मदत करीत आहे.
विशेष बाब म्हणजे कल्पतरू पतपेढी द्वारे भुईगव दफनभूमी येथे २०० झाडे लावण्यासाठी, झाडे वाढवण्यासाठी बराच आर्थिक मदत करीत आहे.
सदर सेवाकार्य करताना भांपक प्रसिध्दी न करता आर्थिक, सामाजिक आघाडीवर कल्पतरू पतपेढी सर्वांगीण विकास व समाज हित जपत आहे.
आर्थिक वाढी सोबत सामाजिक बांधिलकी जपणारी कल्पतरू पतपेढी चा आदर्श वसईतील इतर पतपेढी व बँक यांनी द्यावा.
कल्पतरू पतपेढी अध्यक्ष, संचालक, कर्मचारी व पतपेढी योजनेस साथ देणाऱ्या सभासदास सलाम.