
तीन महिन्यांपूर्वी मे महिन्यात लोकडाऊनच्या काळात घाईघाईत देवतलाव येथे दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबतो म्हणून पूर्ण उन्हाळा संपल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून उघाडीचे काम घाईघाईत घेण्यात आले त्यावेळी असलेले प्रभाग समिती आय चे सभापती श्री लॉरेन्स डायस (BVA) व त्यांच्या कार्यकर्त्याना ह्या कामाचे श्रेय घेण्यासाठी रात्री दिवसा काम सुरू असताना फोटो काढून सोसिएल मीडियात वायरल केले आणि आम्ही किती चांगली कामे करतो व येत्या निवडणुकीत आम्ही येथील उमेदवार आहोत ह्याचा प्रचार करताना दिसत होते. परंतु हे काम सुरू असताना सांडोर विभागातील सामाजिक कार्यकर्ते व बीजेपी अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस श्री सॅमसंन आलमेडा ह्यांनी जागेवर जाऊन ह्या कामाला विरोध केला त्यावेळी तेथे पाईप टाकण्याचे काम सुरू असताना महापालिकेचा अभियंता मुळीक व सभापती डायस स्वतः उपस्थित असताना त्यांना ही उघडी करून काही फायदा होणार नाही असे सांगितले असता त्या पाईप खाली पीसीसी न करता फक्त ग्रीट् पावडर टाकली होती म्हणून ह्याला सॅमसन यांनी विरोध केला तेव्हा डायस ह्यांनी असे सांगितले की तू इंजिनिअर आहे का ?? तुला काय ह्याची माहीती आहे ?? परंतु आता जे व्हायचे ते झाले आणि ह्या पावसाळ्यात पूर्वीपेक्षा जास्त पाणी जमले आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावरून जाताना लोकांना पूर्वीपेक्षा खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आता ही फोटो काढणारी मंडळी कुठे गेली ह्या बोगस कामाची जबादारी हे लोकप्रतिनिधी किंवा इंजिनिअर घेणार का ?? जनतेच्या कराचा पैसा असा वाया घालवणाऱ्या बिनकामाच्या इंजिनिअरवर गुन्हा दाखल होणार का?? ह्या कामाची गंभीर दखल नवनियुक्त डॅशिंग आयुक्त डी गंगाधरन घेणार का? ह्याची गंभीर दखल घेऊन संबंधित अभियंत्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी सॅमसन आलमेडा ह्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे.