वसई (प्रतिनिधी) : रुग्णमित्र म्हणून अनेक वर्षे निस्वार्थीपणे कार्यरत असणारे श्री राजेंद्र ढगे आपल्या प्रसंगावधान तसेच तत्परतेच्या मदतकार्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज प्लाझ्मादान करुन त्यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यात अजून एक पाऊल पुढे ठेवून मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे.

“राममंदिरासाठी अनेकांनी प्राणार्पण केले आहे, आयुष्याची तीस वर्षे कायदेशीर कारवाईसाठी दिली आहेत, सोन्या चांदीच्या वीटा तसेच देणग्यासुद्धा दिलेल्या आहेत. मी अतिगंभीर कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी माझा कॉन्वालेसंट प्लाझ्मा दिलेला आहे. कदाचित माझ्या अंत:करणातील श्री रामाला माझ्याकडून हीच सेवा अभिप्रेत असावी” असे मनोगत राजेंद्र ढगे ह्यांनी व्यक्त केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान, अवयवदान, प्लाझ्मादान अशा उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राजेंद्र ह्यांची सर्वत्र स्तुती होत असली तरी त्यांनी श्रेय नाकारले आहे. रुग्णसेवेसाठी सर्वांनी हातभार लावलेला आहे असे सांगून ह्यापुढे पूर्वीपेक्षा जास्त जोमाने कार्य करण्याची आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा घटकाचे विलगीकरण करून अतिगंभीर कोविड रुग्णाच्या उपचाराकरीता या प्लाज्मा चा वापर केला जातो याला “प्लाझ्मा थेरपी” असे म्हणतात. कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन साथिया ट्रस्ट रक्तपेढी चे चेअरमन श्री विजय महाजन यांनी व्यक्त केले. अधिक माहिती करीता 7709907703 वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *