
राम नामाने अवघी वसई दुमदुमली !

दिनांक ५ आॅगस्ट २०२० रोजी
अयोध्येत ऐतिहासिक अशा श्री राम जन्मभूमी शिलान्यास निमित्ताने सायंकाळी पापडी येथील राम मंदिरात श्री राम पुजन व अभिषेक, आरती आणि देिपोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तर्फे माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. मुकुंदजी मुळये, वसई शहर उपाध्यक्ष श्री.अमित पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. देवेंद्र नाईक, युवा कार्यकर्ते श्री प्रतिक चौधरी व सामाजिक कार्यकर्ते तसनिफ नूर शेख यांनी केले. राम पुजनाचे यजमान पद श्री. अशोक चोपडे दाम्पत्य यांनी भूषविले. तर जिल्हा संयोजक श्री. श्याम पाटकर यांनी रामजन्मभुमी आंदोलन काळातील कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला.
वसई विरार भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. राजन नाईक व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अभय कक्कड यांच्या हस्ते ज्येष्ठ कारसेवक आदरणीय डाॅ. उमेश पै व अन्य कारसेवकांचा श्रीराम प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
सदर राम पुजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. महेंद्र गुर्जर, संघ स्वयंसेवक बाळकृष्ण कनोजिया, कल्पनाताई खरपडे, सना थारा, , हेमंत राज्यगोर, सँमसन आल्मेडा व अन्य भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.