
विरार : खोटे कागदपपत्रे बनवून बेकायदा इमारत बांधल्याप्रकरणी विरारमधील उमेश म्हात्रे आणि भूषण म्हात्रे या दोन बांधकाम व्यवसायिकविरोधात विरार पोलीस ठाण्यात एमआरटीपी आणि फोर्जरीप्रकरणी गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
मनवेलपाडा-राणीतलाव येथील दामोदर निवास इमारतीचे या दोघांनी बेकायदा बांधकाम केले होते. या इमारतीची खोटी कागदपत्रेही बनवण्यात आल्याने या दोघांविरोधात एमआरटीपी आणि फोर्जरीप्रकरणी 6 जून रोजी गुन्हा दाखल विरार पोलिसानी त्यांना अटक केली होती. सोमवार, 10 जून रोजी या दोघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. आर. पाटील यांनी दिली.