

विरार : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणार्या प्रवाशांना नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सना विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाने दणका दिला असून, यातील नऊ जणांना नोटिसा बजावल्या असून, यातील तिघांकडून दंड वसूल केला आहे.
उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणार्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हलसचे एजंट वाजवीपेक्षा जास्त भाडे आकारत असल्याच्या तक्रारी विरार उपप्रादेशिक परिहवन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनंतर परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने 10 मे 2019 रोजी वसई फाटा, मनवेलपाडा तलाव, विरार फाटा आदी ठिकाणी या खासगी ट्रव्हल्सची तपासणी केली होती. यात प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारल्याचे परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाच्या निदर्शनास आले होते. यातील काही ट्रव्हल्सकडे टीपी परमीटही आढळले नव्हते. त्यामुळे परिवहन विभागाने या ट्रव्हल्सविरोधात कारवाई केली होती.
परिवहन विभागाने तपासणी केलेल्या नऊ ट्रव्हल्सना विरार परिवहन विभागाने 14 मे रोजी नोटिस बजावल्या होत्या. त्यातील एमएच-48-के-3994 कडून 26,928 रुपये, एमएच-04-जेके-9619 कडून 1800 रुपये, तर एमएच-08-ई-9396 कडून2400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
………………………………………….
परिवहन विभागाने नोटिस बजावलेल्या ट्रॅव्हल्स आणि त्यांनी आकारलेले भाडे!
एमएच-04-जेके-9619
बस वसई ते म्हसवड
7 प्रवासी, 500 रुपये भाडे
……………..
एमएच-04-जीपी-2226
वसई ते चंदगड व्हाया पुणे
18 प्रवासी, 900 रुपये भाडे
…………………..
एमएच-04-जीपी-5070
वसई ते कोल्हापूर
4 प्रवासी, 800 रुपये भाडे
…………………….
एमएच-04-जेयू-5522
खासगी बस वसई ते रत्नागिरी
11 प्रवासी, 950 रुपये
………………….
एमएच-01-सीव्ही-5556
वसई ते मलकापूर
10 प्रवासी, 700 रुपये भाड़े
………………………..
एमएच-03-सीपी-2526
वसई ते कणकवली
8 प्रवासी, 890 रुपये भाडे
…………………
एमएच-04-जेके-0795
वसई ते कोल्हापूर वाया पुणे
26 प्रवासी, 800 रुपये भाडे
…………………….
एमएच-48-के-3994
वसई ते म्हसवड
6 प्रवासी, 500 रुपये भाडे
……………….
एमएच-04-जीपी-1440
विरार ते रत्नागिरी व्हाया पनवेल-महाड
18 प्रवासी, 550 भाडे